नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली...
नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली... संजय डाफ
लाईफस्टाईल

नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली...

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपुर: सकाळच्या नाश्त्यात खवय्यांची आवडती पांढरी इडली सर्वांनाच माहित आहे. मात्र, काळी इडली (Charcoal Idli) कधी पाहिली आणि चाखली आहे का? नागपूरात (Nagpur) ही काळी इडली मिळते आणि ही काळी इडली सध्या चर्चेचा विषय आहे. या काळ्या इडलीनं नागपूरकरांना भुरळ घातली असून खवय्यांच्या (Foodie's) ही इडली खाण्यासाठी उड्या पडताहेत. (If you eat Nagpur's charcoal (black) idli, you will ask for more! See Anna Reddy's Black Idli)

हे देखील पहा -

मुळची दक्षिण भारतातली मात्र आता अखिल भारतीय खाद्यपदार्थ म्हणून रोज कोट्यवधी भारतीयांकडून खाल्ली जाणारी इडली मुळात पांढऱ्या रंगाची असते. मात्र नागपुरात एका प्रयोगशील इडली प्रेमीने चक्क काळी इडली तयार केली आहे. ही इडली नागपूरकरांच्या पसंतीसही उतरली आहे. "चारकोल इडली" (Charcoal Idli) नावाने ही काळी इडली सध्या नागपुरात प्रसिद्ध झाली आहे. या इडलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. गलेलठ्ठ पगाराची मोठ्या हॉटेलची नोकरी सोडून इडलीत प्रयोग करणारे अण्णा रेड्डी (Anna Reddy, Nagpur) यांनी नागपुरात काळी इडली तयार केली आहे. नारळाचा खोल, संत्र्याची साल, बीट रूटचा पल्प असे पदार्थ वापरून ही खास चारकोल इडली तयार केली जाते. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात कदीम बाग नर्सरी जवळ कुमार रेड्डी यांच्या स्टॉलवर ही इडली मिळते.

सकाळी वॉकर्स स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागपूरकर या चारकोल इडलीसह शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या इडलीचा आस्वाद रेड्डी अण्णाच्या स्टॉलवर घेतात. रेड्डी यांना लहानपणापासूनच भारतीय खाद्यपदार्थांची आणि खास करून इडलीची आवड असल्यामुळे 2016 मध्ये "ऑल अबाउट इडली" या नावाने इडल्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आजवर इडल्यांचे 100 पेक्षा जास्त प्रकार बनवणाऱ्या अण्णा रेड्डींना काळ्या इडलीनेच खरी ओळख दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT