Early signs of kidney stones saam tv
लाईफस्टाईल

Kidney stone symptoms: 'ही' लक्षणं दिसत असतील समजा किडनीमध्ये झालेत स्टोन; शरीरातील बदल ओळखून वेळीच उपचार करा

Early signs of kidney stones: किडनी स्टोनमुळे होणाऱ्या वेदना असह्य असतात. पण जर तुम्ही तुमच्या शरीरातील काही बदलांकडे लक्ष दिले, तर तुम्ही किडनी स्टोनची चिन्हे वेळीच ओळखू शकता आणि त्यावर उपचार घेऊ शकता.

Surabhi Jayashree Jagdish

  • किडनी स्टोनमुळे पाठीत तीव्र वेदना होतात.

  • लघवीत रक्त आणि दुर्गंधी हे गंभीर लक्षण आहे.

  • पुरेसे पाणी प्यायल्याने स्टोनचा धोका कमी होतो.

किडनी हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. किडनी रक्त शुद्ध करून त्यातील अतिरिक्त पाणी आणि अपायकारक घटक बाहेर काढण्याचं काम करते. पण अनेक वेळा किडनीमध्ये छोटे-छोटे कण तयार होतात, ज्यांना ‘किडनी स्टोन’ म्हणतात. हे आकाराने कधी वाळूच्या कणाएवढे लहान असू शकतात, तर कधी छोट्या दगडाऐवढे मोठेही असतात.

वेळेत उपचार न केल्यास हे खूप तीव्र वेदना निर्माण करू शकतात. या स्टोनमुळे तुम्हाला गंभीर त्रास होण्याची शक्यता आहे. या स्टोनची कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

किडनी स्टोनची लक्षणं

  • तीव्र वेदना- पाठीत, कंबरेत किंवा पोटाच्या खालच्या भागात अचानक व असह्य वेदना होणं.

  • लघवी करताना वेदना- लघवी करताना जळजळ किंवा चुरचुर जाणवणं.

  • लघवीचा रंग बदलणं – लघवी लाल, गुलाबी किंवा तपकिरी होणं, जे लघवीत रक्त येण्यामुळे होऊ शकतं.

  • वारंवार लघवी लागणं– विशेषत: रात्री वारंवार लघवीची गरज भासणं.

  • लघवीला दुर्गंधी येणं– लघवीला दुर्गंधी येणं किंवा ती गढूळ दिसणं.

  • उलटी किंवा मळमळ– वेदनांसोबत मळमळ होणं किंवा उलटी होणं.

  • ताप आणि थंडी वाजणं– स्टोनमुळे संसर्ग झाल्यास ताप येणं व अंगाला थंडी वाजणं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, "किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या आहे पण योग्य जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे ती टाळता येऊ शकते. वेळेवर पाणी पिणं, संतुलित आहार घेणं आणि जास्त मीठ तसंच प्रोसेस्ड फूडपासून दूर राहणं आवश्यक आहे. जर तीव्र वेदना, लघवीत रक्त अशी लक्षणे दिसली, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी?

जर वेदना खूपच वाढल्या, लघवीत रक्त दिसले, ताप आला तर उशीर न करता डॉक्टरांकडे जावं. काही वेळा लहान स्टोन आपोआप लघवीबरोबर बाहेर पडतात, पण मोठ्या स्टोनसाठी औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

किडनी स्टोन टाळण्यासाठी उपाय

  • पुरेसे पाणी प्या – दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.

  • मीठ व जंक फूड कमी करा – जास्त सोडियम व प्रोसेस्ड फूड किडनी स्टोनचा धोका वाढवतात.

  • संतुलित आहार घ्या – कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त अन्न आहारात समाविष्ट करा.

  • लघवी रोखू नका – लांब वेळ लघवी रोखल्याने धोका वाढू शकतो.

  • नियमित आरोग्य तपासणी करा – पूर्वी किडनी स्टोन झाला असल्यास वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.

किडनी स्टोन ही अशी समस्या आहे, जी योग्य आहार, पुरेसं पाणी आणि वेळोवेळी तपासणी यामुळे बऱ्याच प्रमाणात टाळता येते. लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

किडनी स्टोनची मुख्य लक्षणे कोणती आहेत?

पाठीत तीव्र वेदना, लघवीत रक्त, जळजळ, वारंवार लघवी, लघवीचा दुर्गंधी आणि ताप येणे ही मुख्य लक्षणे आहेत.

किडनी स्टोन का तयार होतात?

पुरेसे पाणी न घेतल्यामुळे, जास्त मीठ, प्रोसेस्ड फूड आणि असंतुलित आहारामुळे किडनी स्टोन तयार होतात.

किडनी स्टोन टाळण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत?

दिवसाला ८-१० ग्लास पाणी प्या, मीठ आणि जंक फूड कमी करा, संतुलित आहार घ्या आणि लघवी रोखू नका.

किडनी स्टोनच्या लक्षणांमध्ये डॉक्टरांकडे कधी जावे?

जर तीव्र वेदना, लघवीत रक्त, ताप किंवा उलटी असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा?

कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त अन्न आहारात घ्यावे. ताजी भाजीपाला, फळे आणि संपूर्ण धान्ये फायदेशीर आहेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsAppचं जबरदस्त नवीन फीचर! फोटो दिसणार मोशनमध्ये, वाचा माहिती

Maharashtra Live News Update: कृषी पंप चोरणारे चोरटे पकडले, ५ जण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

Abhang Tukaram: जेथे जातो तेथे तू माझा सांगाती; तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा लवकरच येणार प्रेक्षकांसमोर

Solapur Crime : इंजिनिअर तरुणाने चोरल्या दुचाकी; सुटे पार्ट करत भंगारमध्ये विकले, ८ दुचाकींसह चोरटा ताब्यात

Agriculture Scheme: शेतात सिंचन व्यवस्था करायचीय? मग तयार करा शेततळं; सरकार देणार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT