लाईफस्टाईल

Prostate Cancer Signs: आतड्याला त्रास होतोय, वेळीच तपासणी करा; तज्ज्ञांनी सांगितली प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं अन् महत्त्वाचा सल्ला

Rostate Cancer Symptoms: लक्षणं नसतानाही ५४ वर्षीय जेसन यो यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालं. गट फिलिंग आणि वेळेत तपासणीमुळे त्यांचं आयुष्य वाचलं.

Sakshi Sunil Jadhav

प्रोस्टेट कॅन्सर कसा टाळता येईल?प्रोस्टेट कॅन्सर हा आजार पुरुषांना कोणत्याही वयात होतो.

डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही सतत तपासणी करत राहणे महत्वाचे

Cryotherapy उपचाराने आयुष्य वाचण्याची संधी

PSA टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर गंभीर प्रकारे जाणवू लागला आहे. ब्रिटनमधील ५४ वर्षाचे जेसन यो (Jason Yeo) या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नसताना प्रोस्टेट कॅन्सरच्या आजाराला सामोरं जावं लागलं. जेसन हे डेवॉन येथील ट्रॅव्हलिंग सेल्समन असून ते नेहमी फीट, निरोगी, खेळाडूवृत्तीचे, सगळ्या कामात सक्रीय राहणारे व्यक्ती होते. मात्र त्याच्या गट फिलिंगवर म्हणजेच मनातल्या आवाजावर विश्वास ठेवल्यामुळे त्याचं आयुष्य वाचलं.

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?

प्रोस्टेट हा पुरुषांच्या शरीरातील लहान ग्रंथी आहे जी मूत्राशयाखाली आणि गुदाशयासमोर असते. ही ग्रंथी वीर्यातील द्रव तयार करते. जे शुक्राणूंना आरोग्यदायी ठेवतं. हा कॅन्सर गंभीर असला तरी सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. तज्ञांच्या मते, दर १०० पुरुषांपैकी १३ जणांना आयुष्यात कधी ना कधी प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो.

डॉक्टरांनी सुरुवातीला दिला वेट अँड वॉच सल्ला

जेसन यांनी तपासणीदरम्यान नियमित आरोग्य तपासणीचा भाग म्हणून PSA (Prostate-Specific Antigen) टेस्ट केली होती. MRI आणि बायोप्सी चाचणीनंतर निदान झालं की कॅन्सर अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. त्यानंतर त्यांनी Cryotherapy हे विशेष उपचार घेतले. जे संपूर्ण यूकेमध्ये सर्वत्र उपलब्ध नाहीत. जेसन यांनी सांगितलं, ''माझ्या पत्नीने हेल्थ चेकअपसाठी व्हाउचर दिलं होतं. त्या तपासणीत एक छोटा रेड सिग्नल मिळाला आणि आम्ही पुढे कारवाई केली. मी वैद्यकीय तज्ञ नाही, पण मन सांगत होतं की काहीतरी चुकतंय आणि माझ्या पत्नी व वडिलांनी मला हार मानू दिली नाही.

प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती?

सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, पण पुढील टप्प्यावर खालील बदल जाणवू शकतात:

1 वारंवार लघवी लागणे, विशेषतः रात्री सतत लघवी होणे.

2 लघवीचा प्रवाह कमी होणे किंवा मध्येच थांबणे.

3 लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे.

4 मूत्राशयावर नियंत्रण कमी होणे.

5 वीर्यात किंवा लघवीत रक्त दिसणे.

6 संभोगादरम्यान वेदना किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन होणे.

7 पाठी, कंबरेत किंवा छातीत वेदना होणे.

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?

पुरुषांच्या शरीरातील ग्रंथीतील पेशी अनियमित वाढल्यास कॅन्सर तयार होतो.

प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात?

लघवीच्या सवयींमध्ये बदल, वेदना, रक्त येणे ही नंतरची लक्षणं असू शकतात.

PSA टेस्ट केली आणि तपासणीत कॅन्सरचं निदान झालं.

जेसन यो यांनी कॅन्सर कसा ओळखला?

PSA टेस्ट केली आणि तपासणीत कॅन्सरचं निदान झालं.

प्रोस्टेट कॅन्सर कसा टाळता येईल?

नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि वेळेत PSA टेस्ट केल्याने लवकर निदान शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाषणात मोठा गोंधळ; नेमके काय घडले? VIDEO

निवृत्त बँक कर्मचाऱ्यानं बायको अन् मुलासह घरातच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमुळे गूढ वाढलं

कोणत्या ड्राय फ्रुटमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन असतं?

Bajra ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी बाजरीचे लाडू

Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT