Cancerous tumor symptoms early warning saam tv
लाईफस्टाईल

Cancer warning signs: 99% लोकं चुकतात! ही लक्षणं दिसून आली तर समजा शरीरात कॅन्सरच्या गाठीची होतेय सुरुवात

Cancerous tumor symptoms early warning: कॅन्सर हा गंभीर आजार आहे, पण त्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. तज्ञांच्या मते, ९९ टक्के लोक ही लक्षणे सामान्य आजार समजून तपासणी करत नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याचं नाव ऐकूनच अनेकांच्या मनात भीती निर्माण होतो. मात्र आता कॅन्सरवरही उपचार असून सुरुवातीच्या स्टेजमधील कॅन्सरही पूर्णपणे बरा होऊ शकतो. प्रत्येक आजाराची काही ना काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं असतं.

अनेकदा कॅन्सरच्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं तुम्ही जितक्या लवकर ओळखाल तितके त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात. आज वर्ल्ड कॅन्सर डे मानला जातो. आजच्या दिवसाच्या निमित्ताने कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं काय आहे जाणून घेऊया.

अचानक वजन कमी होणं

जर तुमचं अचानक कोणतंही डाएट किंवा व्यायाम न करता ४-५ किलो वजन कमी होत असेल तर खूश होऊ नका. कारण हे चिंतचं कारण असू शकतं. अचानक वजन कमी होणं हे स्वादुपिंड, पोट किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. जेव्हा शरीर कॅन्सरच्या पेशींशी लढतं तेव्हा ते तुमची ऊर्जा खर्च होते परिणामी वजन कमी होते.

सततचा थकवा

कामानंतर थकवा जाणवणं सामान्य आहे. मात्र तुम्हाला झोपून उठल्यानंतर देखील थकवा जाणवत असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ब्लड कॅन्सर किंवा कोलन कॅन्सरमध्ये अंतर्गत रक्तस्त्रावामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.

त्वचेतील बदल

त्वचेवर नवीन तीळ दिसणं किंवा जुन्या तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होणं हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे शरीरावर कुठेही विशेषतः महिलांना स्तनामध्ये वेदनारहित गाठ जाणवणं विशेषतः धोकादायक असतं. गाठीला कोणत्याही वेदना होत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

पोटाच्या समस्या

सतत कॉन्स्टिपेशन, अतिसार किंवा शौचाच्या रंगात बदल हे अनेकदा आहारातील समस्या मानल्या जातात. जर या समस्या बरेच आठवडे दिसल्या किंवा शौचातून रक्त येत असेल तर ते कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे अन्न गिळण्यास सतत अडचण येणं हे घसा किंवा अन्ननलिकेच्या कॅन्सरचं लक्षण असतं.

सततचा खोकला

जर तुमचा खोकला ३-४ आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालू राहिला आणि औषधांना प्रतिसाद देत नसेल तर ते फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लक्षण असतं. अचानक कर्कश आवाज येणं किंवा आवाजात कर्कशपणा येणं हे देखील घशाच्या कॅन्सरचं एक लक्षण मानलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Skin Makeup Tips: ड्राय त्वचेवर मेकअप करताना कोणत्या चुका करु नयेत? कसा करावा परफेक्ट मेकअप

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार; राज्य सरकारचा मास्टर प्लान

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र ATS कडून मुंबईत तीन ठिकाणी छापे

Eknath Shinde: दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक मायदेशी परतणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था

HBD Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती किती? एका चित्रपटाने अभिनेत्री झाली रातोरात स्टार

SCROLL FOR NEXT