Kidney Disease saam tv
लाईफस्टाईल

Kidney Disease: शरीरावर हे संकेत दिसू लागले तर समजा तुमची किडनी होतेय खराब; दुर्लक्षित करणं ठरेल घातक

Kidney Disease Symptoms: किडनीच्या आजाराची लक्षणं सुरुवातीला सहज लक्षात येत नाहीत. मात्र वारंवार लघवी होणे, रात्री लघवीसाठी उठणे, लघवीचा रंग बदलणे, फेस येणे किंवा पाय, हात, चेहऱ्यावर सूज दिसणे यांसारखे बदल जाणवल्यास तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी म्हणजे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव मानला जातो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी अनेक महत्त्वाची कामं करते. रक्तातील घाण आणि शरीरासाठी हानिकारक पदार्थ बाहेर काढण्याचं काम किडनी करते. याशिवाय शरीरातील पाणी आणि इतर द्रवपदार्थांचं संतुलन योग्य ठेवण्याची जबाबदारीही किडनीवर असते.

मात्र किडनीशी संबंधित आजारांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांची लक्षणं सुरुवातीला सहज लक्षात येत नाहीत. अनेक वेळा किडनीचा आजार वाढल्यानंतरच त्याची लक्षणं स्पष्टपणे जाणवू लागतात. त्यामुळे शरीरात होणारे छोटे-छोटे बदलही दुर्लक्षित न करणं महत्त्वाचं आहे.

लघवी करण्याच्या सवयीत बदल?

लघवी करण्याच्या सवयीत अचानक बदल झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला लागणं रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठावं लागणं, या संकेताकडे गंभीरतेने पाहा.

लघवीच्या रंगात झालेला बदलही महत्त्वाचा संकेत मानला जातो. लघवी अचानक गडद रंगाची दिसत असेल किंवा त्यामध्ये फेस दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे लघवी करताना जळजळ होणे, हा देखील शरीराकडून मिळणारा एक संकेत असू शकतो.

पाय, हात आणि चेहऱ्यावर सूज येतेय?

किडनी ही रक्तातील घाण आणि अतिरिक्त पदार्थ योग्य प्रकारे गाळू शकत नसेल, तर शरीरात अतिरिक्त पाणी आणि सोडियम साचू लागतो. यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये सूज येऊ शकते. पाय, घोटे, हात आणि चेहऱ्यावर विनाकारण सूज दिसणं हे लक्ष देण्यासारखं लक्षण आहे. याआधी अशी समस्या नसताना अचानक शरीराच्या या भागांना सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

किडनीशी संबंधित अनेक आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणं न दाखवता वाढत असतात. त्यामुळे लघवीतील बदल किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसणारी सूज यांसारख्या संकेतांकडे वेळीच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. अशी लक्षणं जाणवत असतील किंवा ती वारंवार होत असतील, तर योग्य तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E Challan: वीज बिलातून ई-चालान वसूल होणार? सुप्रीम कोर्टाच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Maharashtra News Live Update:विनर्स ॲकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई होणार

Gandhi Jayanti 2026: महात्मा गांधींच्या जीवनाशी जोडलेली 'ही' ७ ऐतिहासिक ठिकाणे, जाणून घ्या त्यांचा खास इतिहास

Pulses Price : सणासुदीच्या तोंडावर डाळ स्वस्त होणार, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Heart Attcak : छातीत दुखतंय? हार्ट अटॅकच्या कधीच न कळून येणाऱ्या या गंभीर लक्षणांकडं दुर्लक्ष करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT