Heart disease saam tv
लाईफस्टाईल

Heart disease: शरीरात अचानक ही ५ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय धोक्यात आहे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक महत्त्वाचे इशारे देत असते. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा, सूज आणि चक्कर यांसारखी लक्षणे वेळेत ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर धोका टाळण्यास मदत होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish
heart attack symptoms

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक अचानक येतो असे अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात शरीर आधीच काही महत्त्वाचे इशारे देत असतं. ही लक्षणं वेळेत ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर धोका टाळता येऊ शकतो.

heart disease

धोका कशाने वाढतो?

चुकीची जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे हार्ट अटॅक वाढतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

cardiovascular health

छातीत दुखणं

छातीत जडपणा, दाब, आवळल्यासारखं वाटणं किंवा जळजळ होणं हे हृदयाशी संबंधित समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. विशेषतः चालताना जिने चढताना किंवा शारीरिक श्रम करताना ही अस्वस्थता वाढत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहावं.

warning signs

नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं

दैनंदिन साधी कामं करतानाही अचानक खूप थकवा जाणवत असेल तर तो सामान्य थकवा नाही. हृदय शरीराच्या सर्व भागांमध्ये पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते.

leg swelling

श्वास घेण्यास त्रास होणं

चालताना, जिने चढताना किंवा अगदी विश्रांती घेतानाही श्वास लागणं हे हृदयाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. काही लोकांना झोपताना सरळ झोपल्यावरही श्वास घेण्यास त्रास होतो.

ankle swelling

पाय, घोटे किंवा हातांना सूज

हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास शरीरात द्रव साचू लागतो आणि त्यामुळे पाय, घोटे, पोटऱ्या किंवा हातांना सूज येऊ शकते. ही सूज सामान्य कारणांमुळेही येऊ शकते, मात्र ती वारंवार होत असेल तर हृदयाच्या कार्यक्षमतेची तपासणी आवश्यक असतं.

dizziness

चक्कर येणं

अचानक चक्कर येणं, डोके हलकं वाटणं किंवा कोणतंही कारण नसताना थंड घाम येणं ही हृदयाशी संबंधित गंभीर समस्या दर्शवणारी लक्षणं असू शकतात. अशा वेळी उशीर न करता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

left arm pain heart attack

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Chanakya Niti: वयाच्या तिशीतच या ५ गोष्टींचं पालन करा, जगातल्या यशस्वी व्यक्तींमध्ये तुमचीही होईल गणना

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस

Thane Fort : इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाण्यापासून काही अंतरावर लपलाय 'हा' किल्ला, सुट्टीत नक्की फिरा

Ev Vehicle: 1 लाखांचा इन्सेंटिव्ह, रोड टॅक्स माफ! इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची मोठी घोषणा

विधान भवनाला पुन्हा धमकीचा ई-मेल; मुंबईतील तीन महत्त्वाची ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी

SCROLL FOR NEXT