Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे थोर गुरू मानले जातात. त्यांचे विचार लोक आजही फॉलो करतात.
तिशीतल्या व्यक्तीला खूप जबाबदाऱ्या असतात. त्यात त्यांची स्वप्न असतात, त्यांनाही यशस्वी व्हायचं असतं.पण त्यांच्याकडे मार्ग नसतो.
चाणक्य नितीनुसार तुम्हाला भविष्यात तिशीत यश मिळवण्यासाठी पुढील ५ गोष्टी खूप फायदेशीर ठरणार आहेत.
गेलेली वेळ आणि वाढतं वय पुन्हा येत नाही. त्यामुळे त्या-त्या वेळेत दिलेलं काम पूर्ण करत राहा. नाहीतर वेळ निघून जाईल.
तरूणपणी जास्त जबाबदार्या नसतात. तसेच विविध गोष्टी शिकण्याची संधी सुद्धा असते. त्यामुळे या वयात मेहनत केल्याने आयुष्यात यश मिळवता येतं.
चाणक्यांच्या मते, तुम्ही जितकं कमवता तितकी बचत करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण बचतीने आयुष्यातल्या बऱ्याच संकटांना सहज सामोरं जाता येऊ शकतं.
चाणक्यांच्या मते, जे मित्र तुमच्याबद्दल चांगला विचार करतात, नव्या गोष्टींबदल करिअरबद्दल चर्चा करतात त्यांचीच साथ तुम्हाला यशस्वी बनायला मदत करू शकते.
चाणक्यांच्या मते आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याने तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल.