गणेश चतुर्थीपूर्वी घर स्वच्छ करणे अत्यंत शुभ आहे.
तुटलेल्या मूर्ती घरातून हटवाव्यात.
फाटके कपडे दान करणे फायदेशीर आहे.
गणेश चतुर्थी हा बाप्पाच्या स्वागताचा आणि त्यांच्या कृपेचा मोठा उत्सव मानला जातो. असं मानलं जातं की, जर या दिवशी घर स्वच्छ, नीटनेटके आणि सकारात्मक उर्जेने भरलेले असेल तर गणरायाची कृपा दुपटीने वाढते. म्हणूनच गणेशमूर्तीची स्थापना करण्याआधी आणि नंतरचे १० घराची स्वच्छता करणं आणि अशुभ वस्तू घरातून दूर करणं खूप महत्त्वाचं आहे.
ज्या घरात स्वच्छतेसह बाप्पाची स्थापना केली जाते, तिथे समृद्धी, सुख-शांती आणि ऋद्धी-सिद्धी नांदते. चला तर मग पाहूया की जर तुमच्या घरात घरातून कोणत्या अशुभ वस्तू लगेच हटवायला हव्यात.
घरात ठेवलेल्या तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती व छायाचित्रे अपशकुन मानली जातात. विशेषत: देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणून गणेश चतुर्थीपूर्वी या मूर्ती किंवा चित्रं श्रद्धेने नदीत विसर्जित करावीत किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावीत.
घरात पडलेले फाटके, जुनाट आणि बराच काळ न वापरलेले कपडे घरात अडथळे निर्माण करतात. असे कपडे घरातून काढून टाका किंवा दान करा. यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते.
घराच्या कोपऱ्यांत किंवा भिंतींवर लागलेल्या जाळी हे राहु-केतू दोषाचं लक्षण मानलं जातं. हे घरात नकारात्मकता वाढवतात आणि लक्ष्मीच्या आगमनात अडथळा आणतात. म्हणून बाप्पा आणण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ व नीटनेटके करणे आवश्यक आहे.
पूजाघरात किंवा घरात ठेवलेले अर्धवट जळलेले दिवे, अगरबत्ती किंवा त्यांची राख अशुभ मानली जाते. हे घरातील शुद्धता कमी करतात. म्हणून गणेश चतुर्थीपूर्वी पूजा स्थळ स्वच्छ करून नवीन दिवा व अगरबत्ती पेटवा, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल.
घरात पडलेली तुटकी उपकरणं, खराब इलेक्ट्रॉनिक सामान किंवा गंजलेली धातूची वस्तू घरातील उर्जेला अडथळा आणतात. या वस्तू घरातून बाहेर काढा किंवा देऊन टाका.
हिंसक प्राणी, युद्ध, रडणारी मुलं किंवा भीतीदायक दृश्यं असलेली चित्रं घरात ठेवणं अपशकुन मानलं जातं. अशी चित्रं घरातून काढून टाका आणि त्याऐवजी गणपती, लक्ष्मीमाता, निसर्ग वा सकारात्मक उर्जा देणारी चित्रं लावा.
घरात ठेवलेली वाळलेली, कोमेजलेली झाडं दुर्भाग्याचं लक्षण मानली जातात. बाप्पाची स्थापना करण्याआधी अशी झाडं घरातून काढून टाका आणि त्यांच्या जागी तुळस, मनीप्लांट किंवा हिरवाई देणारी निरोगी झाडं लावा.
गणेश चतुर्थीपूर्वी घरातून कोणत्या मूर्ती हटवाव्यात?
तुटलेल्या आणि खंडित देव-देवतांच्या मूर्ती हटवाव्यात.
फाटके कपडे काय करावेत?
फाटके आणि जुने कपडे दान करावेत किंवा फेकून द्यावेत.
पूजाघरातील अर्धवट जळलेले दिवे का हटवावेत?
अर्धवट दिवे अशुभ मानले जातात आणि ऊर्जा कमी करतात.
घरात कोमेजलेली झाडे का टाळावीत?
कोमेजलेली झाडे दुर्भाग्याचे प्रतीक आहेत.
नकारात्मक चित्रांच्या जागी काय लावावे?
गणपती, लक्ष्मीमाता किंवा निसर्गाची सकारात्मक चित्रे लावावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.