मुंबई : उन्हाळ्यात अधिक उष्णेतमुळे आपण सतत फॅन, एसी किंवा कुलरच्या थंड हवेत राहतो. उन्हाळ्यात गारवा मिळवण्यासाठी एसी आणि कुलर वापरणे फायदेशीर ठरते. (Skin Care Tips in Marathi)
हे देखील पहा-
आपल्या ऑफिसमध्ये एसीचे तापमान अधिक प्रमाणात असते. त्यामुळे बऱ्याचदा आपली त्वचा अधिक कोरडी बनते. उन्हाळ्यात अधिक काळ एसी बसल्याने त्वचेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा, खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या वाढते. हे टाळण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. (How to care dry skin)
त्वचा कोरडी होत असल्यास या टिप्स फॉलो करा -
१. ऑलिव्ह ऑइलचा वापर कोरड्या त्वचेला पुन्हा नव्यासारखे करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ऑलिव्ह ऑईल (Oil) त्वचेवर लावून ओल्या कापडाने पुसा. यामुळे छिद्रांमधील घाण साफ होते. यासोबत ऑलिव्ह ऑईल त्वचेतील आर्द्रता वाढवून मॉइश्चर लॉक करण्याचे काम करते.
२. एवोकाडोमुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी मदत होते. यात अनेक आवश्यक अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेचे पोषण करतात आणि नैसर्गिक चमक देतात. वृद्धत्व, सुरकुत्या, मुरुम, मुरुम यापासून बचाव करते आणि त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकते. त्यासाठी एवोकाडोचा रस किंवा त्याचे काप चेहऱ्यावर चोळावे.
३. पपईत असणाऱ्या एंजाइम्समुळे त्वचेवरील मृत पेशींना काढून टाकण्यास मदत करते. पपईला त्वचेवर नियमितपणे घासल्याल कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळते. तसेच, त्वचा (Skin) उजळण्यास मदत होते.
४. सौंदर्यांसाठी उपयुक्त अशा मधात असणाऱ्या घटकांमुळे चेहऱ्यावरील मुरुमांची (Pimples) समस्या कमी होते. मृत त्वचेला पुन्हा नवे करण्यासाठी फायदेशीर ठरते. मध आणि दूध एकत्र करुन त्वचेवर लावल्यास कोरड्या त्वचेपासून सुटका होईल.
अशाप्रकारे कोरड्या त्वचेपासून मुक्तता आपण मिळवू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.