Curd Benefits freepik
लाईफस्टाईल

Curd Benefits: फ्रिजमध्ये दही बराच काळ पडून असेल तर असा करा वापर, होतील 'हे' फायदे

Natural Remedies: आंबट दह्याचा सौंदर्य उपचारांमध्ये उत्तम उपयोग होतो. दह्यात बेसन व हळद मिसळून चेहरा उजळतो, तर दही, आवळा पावडर व तेलाने केस मऊ व घनदाट होतात.

Dhanshri Shintre

कधीकधी दही घरात काही दिवस पडून राहतं आणि ते आंबट होऊ लागतं. अशा वेळी ते फेकून देण्याऐवजी त्वचा आणि केसांसाठी वापरा. आंबट दह्याचा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी प्रभावी हेअर किंवा स्किन मास्क तयार करू शकता. त्यात हळद, बेसन, लिंबू, मध, अंड किंवा अ‍ॅलोवेरा जेल मिसळून मास्क तयार करता येतो.

यामुळे केस मऊ आणि त्वचा उजळ होते. दह्यामध्ये असणारे लॅक्टिक अ‍ॅसिड, प्रथिने आणि प्रोबायोटिक्स त्वचा व केसांसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे दही आंबट झाल्यावर ते फेकून न देता, नैसर्गिक फेस मास्क किंवा हेअर मास्कसाठी वापरणे अधिक लाभदायक ठरेल.

२ चमचे आंबट दह्यात १ चमचा बेसन आणि थोडीशी हळद घालून फेस पॅक तयार करा. ते चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. हा उपाय त्वचेची टॅनिंग कमी करून नैसर्गिक उजळपणा देतो. दुसरा उपाय म्हणजे १ चमचा दही, १ चमचा मध आणि १ चमचा ओट्स एकत्र करून स्क्रबर तयार करा. त्वचेला हलके मसाज करा, यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा मॉइश्चराइज होते.

दही, आवळा पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांसाठी पौष्टिक मास्क तयार करा. ३ चमचे दही, १ चमचा आवळा पावडर आणि १ चमचा तेल मिसळून तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. ३० मिनिटांनी सौम्य शाम्पूने धुवा. हे केसांना मऊपणा आणि मजबुती देते. दुसरा पर्याय म्हणजे दह्यात अंडी आणि मेथी पावडर घालून मास्क तयार करा, जो केसगळती कमी करतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT