High cholesterol symptoms on face saam tv
लाईफस्टाईल

Bad cholesterol facial signs: नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढल्यास चेहऱ्यावर दिसतात 'हे' संकेत; चुकूनही दुर्लक्ष करू नका

High cholesterol symptoms on face: डोळ्यांभोवती किंवा आजूबाजूला पिवळे ठिपके दिसत असतील तर सावध व्हा. जर हे लक्षण तुम्हाला दिसलं तर ही स्थिती झेंथेलास्मा असू शकते. हे ठिपके बहुतेकदा शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल हा एक सायलेंट किलर मानला जातो. अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. कोलेस्ट्रॉलची लक्षणं ही चेहऱ्यापासून शरीरापर्यंत स्पष्टपणे दिसून येतात. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हा निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

जर याची लक्षणं वेळीच समजली तर आपण कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यावर भर देऊ शकतो. यावेळी जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत, जी पाहून आपण शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाबद्दल सतर्क राहिलं पाहिजे.

डोळ्यांच्या खाली पिवळे डाग

डोळ्यांभोवती किंवा आजूबाजूला पिवळे डाग दिसतात. जर असं असेल तर ही स्थिती झेंथेलास्मा असू शकतं. हे डाग बहुतेकदा शरीरात कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण जास्त असल्याचं सांगतात. चेहऱ्याचा रंग बदलणं आणि पापण्यांवर पिवळे डाग येणं देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचं लक्षण आहे.

कॉर्नियामध्ये बदल

डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती हलक्या रंगाचे वर्तुळ तयार होत असल्याचं दिसून आलं तर सावधगिरी बाळगली पाहिजे. डोळ्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागतं. ते दृष्टीला हानी पोहोचवू शकत नाही.

सतत थकवा जाणवणं

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनसह रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही. त्यामुळे हृदयाला त्रास होतो. परिणामी शरीराला थकवा वाटतो.

चेहऱ्यावर बदल

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे त्वचेत कोरडेपणा आणि खाज सुटण्याची समस्या दिसून येऊ शकते. यावेळी तुमच्या त्वचेवर निळे आणि जांभळे रंगाचे डाग तयार होण्याचा धोका असतो. जे रक्ताभिसरणावर परिणाम झाला असल्याचे संकेत देतात.

पोट आणि छातीत वेदना होणं

जर नसांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं तर त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे फुफ्फुसं आणि हृदयावरही दबाव वाढतो. यामुळे छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं

  • जंक फूडचं अधिक प्रमाणात सेवन

  • शारीरिक हालचालींपासून अंतर

  • जास्त वजन आणि लठ्ठपणा

  • दारू आणि सिगारेटचं सेवन

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT