baby care tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सुदृढ बाळाचे दात येण्यास उशीर होत असला, तर घाबरू नका हे उपाय करा

बाळाच्या दातांकडे सुरवातीपासूनच लक्ष दिले तर दात येताना त्याला कसलाही त्रास होत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बाळाला साधारणत: ६ ते २४ महिन्यांत दात येऊ लागतात परंतु, ते येताना त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. (baby care tips in Marathi)

हे देखील पहा-

काही वेळेस ६ ते १ वर्ष ओलांडून सुध्दा आपल्या बाळाला दात येत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढू लागते व आपल्याला त्याचे टेंशन येते. बाळाला दात येण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतो. बाळाच्या दातांकडे सुरवातीपासूनच लक्ष दिले तर दात येताना त्याला कसलाही त्रास होत नाही. यावेळी बाळाला त्रास होत असला तरी आपण त्यांची काळजी घ्यायला हवी हे पाहूया.

१. बाळाला चावण्यासाठी मऊ कापड द्या व हिरड्यांचा मसाज करा. दात सहजतेने येतील. जेव्हा बाळाला पहिले दात येतात तेव्हा त्यांना वेदना होत असतात. ती बोलू शकत नसतात पण रडून ते सांगण्याचा प्रयत्न करीत असतात.

दात उशिरा येण्याची कारणे

बाळाचे दुधाचे दात सहाव्या (Milk) महिन्यापासून येण्यास सुरुवात होते. जर दात उशीरा येत असतील तर घाबरण्याचे कारण नाही. त्यांची अनेक कारणे असू शकतात. जर बाळाचे केस, त्वचा व हाडे व्यवस्थित असतील तर घाबरण्यासारखे काही नसते.

१. बाळाचे दात उशिरा येण्यासाठी काही वेळेस अनुवंशिक असते. जर आई व वडिलांचे दात उशिरा आले असतील तर बाळाचे दातही उशीरा येऊ शकतात.

२. बाळाच्या शरीरात पोषणाची कमतरता असल्यामुळेही त्यांना दात उशीरा येऊ शकतात.

३. बाळाचा जन्म वेळेपूर्वी झाला असेल तर त्यांना दात उशीरा येऊ शकतात. बाळाला भरपूर पोषण देऊनही दात वेळेवर येत नसतील तर असे व्हिटॅमिन डीची कमतरता व हायपोथायरायडिज्ममुळेही होऊ शकते. यासाठी आपण डॉक्टरांशी संपर्क साधायला हा.

दातदुखी कमी करण्याचे घरगुती उपचार

१. चावण्यासाठी मऊ व ओले कापड द्या.

२. बाळांच्या हिरड्यांवर स्वच्छ बोटांनी मालिश करू शकता.

३.बाळाला (Baby) आई वडिलांच्या प्रेमाची गरज असते. प्रेम वेदन थोड्या दूर करू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT