Early signs of heart disease saam tv
लाईफस्टाईल

Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

Body changes indicating heart risk: आजकाल हृदयविकार ही एक गंभीर समस्या बनली आहे, जी कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते. अनेकदा हृदयविकाराची लक्षणं इतकी सूक्ष्म किंवा अस्पष्ट असतात की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयविकाराला ‘साइलेंट किलर’ म्हटलं जातं. मात्र याला असं का संबोधलं जातं हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा हृदयाचे आजार हळूहळू आणि कोणताही ठळक लक्षण न देता शरीरात वाढत असतात. दरवर्षी जवळपास 1.79 कोटी लोक हृदय विकारामुळे आपला जीव गमावतात. हॉर्ट अटॅक हे जगातील सर्वात मोठं मृत्यूचं कारण बनलंय.

शरीर आपल्याला वेळेवर सूचक संकेत देत असतं. पण हे संकेत ओळखून योग्य वेळी उपचार कऱणं फायद्याचं असतं. यामुळे त्याचे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. शरीराच्या कोणत्या 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं ते आपण या आर्टिकलच्या माध्यमातून पाहूयात.

अचानक उभं राहताना चक्कर येणं

तुम्ही जेव्हा अचानक उभं राहता आणि डोकं गरगरतं तेव्हा यामागे रक्तदाबात होणारा अचानक बदल किंवा हृदयातील रक्तप्रवाहाचा अडथळा असू शकतो. हे लक्षण हृदयाच्या अरिथमियासारख्या (arrhythmia) समस्येचं लक्षणं असू शकतं.

दम लागणं

जर एखादं साधं काम करतानाही तुम्हाला जास्त दम लागत असेल तर हे हृदयाच्या पंपिंग क्षमतेत घट झाल्याचं लक्षण असू शकतं. यावेळी तुम्ही हृदय तपासणी आवश्यक आहे.

वाकताना त्रास होणं

जर तुमचं हृदय शरीराच्या स्नायूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवू शकत नसेल तर साधं वाकणंही तुमच्यासाठी अवघड होऊ शकतं. त्यामुळे या परिस्थितीकडे लक्ष देणं तुमच्या फायद्याचं आहे.

हृदयाचे ठोके वाढणं

ज्यावेळी हृदयावर अधिक ताण असतो किंवा तणावाचे हार्मोन्स वाढलेले असतात तेव्हा हृदयाचे ठोके जास्त जाणवतात. जर हे लक्षण वारंवार होत असेल तर ECG किंवा होल्टर मॉनिटरिंगसारखी तपासणी करावी लागते.

छातीत वेदना होणं

छातीत येणारा जडपणा म्हणजे अँजिना किंवा हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण असू शकतो. हे सामान्यतः हृदयाला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे होतं.छातीत जडपणा, हात किंवा जबड्यापर्यंत जाणाऱ्या वेदना असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा. ही आपत्कालीन स्थिती असू शकते.

हात, मान किंवा खांद्यामध्ये वेदना होणं

हृदयाचा त्रास अनेकदा इतर भागांमध्ये वेदना रूपात जाणवतो. विशेषतः डावा हात, खांदा किंवा मान यामध्ये वेदना होऊ शकतात. जर या वेदना कोणत्याही इतर कारणाशिवाय होत असतील आणि श्वास घ्यायला त्रास किंवा छातीत अस्वस्थता असेल, तर त्वरित आपत्कालीन उपचार घेतले पाहिजेत.

अस्वस्थता जाणवणं

अनेकदा हलकं छातीत वेदनांसोबत वारंवार अस्वस्थपणा जाणवू शकतो. दरम्यान हेही ब्लॉकेजमुळे होणारं लक्षण असू शकतं. जर ही अस्वस्थता वारंवार होत असेल, तर ECG किंवा स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी.

हृदयाचे अनियमित ठोके जाणवणं

जास्त तणाव, झोपेची कमतरता, अॅट्रियल फायब्रिलेशन सारख्या आजारांमुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. जर हे ठोके चुकणं वारंवार होत असेल आणि त्यासोबत चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडण्याची समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांकडे जा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News: कोब्रासोबत स्टंट करायला गेला अन् जीव गमावून बसला, भंडाऱ्यातील तरुणाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

धक्कादायक! नवी मुंबईतील शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालयात भांडी घासायला लावली; प्रकार मोबाईलमध्ये कैद | Panvel

पंढरपुराच्या दिशेनं जाताना २ महिलांवर काळाचा घाला, कंटेनरची दुचाकीला धडक; चिरडल्यानं जागीच मृत्यू | Accident

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

SCROLL FOR NEXT