Maratha Empire: मराठा साम्राज्यातील छत्रपती आणि पेशवा यांच्यात फरक काय होता?

Surabhi Jayashree Jagdish

'छत्रपती’ आणि ‘पेशवे’

'छत्रपती’ आणि ‘पेशवे’ हे मराठा साम्राज्याचा मजबूत स्तंभ मानले जात होते. पण तुम्हाला माहिती आहे का की, या दोन्ही पदांमध्ये नेमका काय फरक होता?

मराठा साम्राज्याची स्थापना

सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वतःला ‘छत्रपती’ घोषित केलं. हा पदवी मराठा साम्राज्यातील सर्वोच्च मानली जात होती.

राजांचा राजा

‘छत्रपती’ म्हणजे राजांचा राजा असे मानले जात असे. हा पदवी साम्राज्यातील सर्वात उंच आणि प्रतिष्ठेचा होता. त्यामुळे छत्रपतीला सर्वोच्च सत्ता प्राप्त होती.

वंशपरंपरागत पदवी

शिवाजी महाराजांनंतर अनेक पिढ्यांपर्यंत त्यांच्या वंशजांनी हा पदवी सांभाळली. इतिहासकार सांगतात की, छत्रपतीची गादी नेहमी शिवाजी महाराजांच्या वंशजांना मिळत असे. त्यामुळे हा पदवी वंशपरंपरागत होता.

सर्वात ताकदवान मंत्री

छत्रपतीनंतर साम्राज्यातील सर्वात ताकदवान मंत्री ‘पेशवा’ म्हणून ओळखला जात असे. पेशव्याला प्रशासन आणि युद्धनीतीची जबाबदारी दिली जात असे. त्यामुळे साम्राज्याच्या कारभारात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट्ट

पेशवा बाजीराव प्रथम म्हणजे श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट्ट हे चौथे छत्रपती शाहू महाराजांचे पेशवा होते. त्यांनी आपल्या युद्धनीती आणि कौशल्याने अनेक युद्धे जिंकली. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले.

नामधारी शासक

पेशवे हे एक पद होतं ज्यांची नियुक्ती केली जात असे. कालांतराने छत्रपती फक्त नामधारी शासक राहिले. आणि संपूर्ण सत्ता पेशव्यांच्या हातात आली.

मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ

छत्रपती आणि पेशवे हे दोन्ही मराठा साम्राज्याचे मजबूत आधारस्तंभ होते. एकीकडे छत्रपती साम्राज्याचे सर्वोच्च प्रतीक होते. तर दुसरीकडे पेशवे प्रत्यक्ष सत्ता आणि कारभार सांभाळत होते.

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

येथे क्लिक करा