Kidney Damage Symptoms on face saam tv
लाईफस्टाईल

Kidney damage: डोळ्यांमध्ये दिसणारे हे ५ बदल वेळीच ओळखा; किडनी खराब होण्याची असतात लक्षणं

Eye changes signal kidney damage: किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा फिल्टर आहे. जेव्हा किडनीच्या कार्यक्षमतेत घट होते आणि विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात. तेव्हा त्याचे परिणाम किडनीवर दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. किडनीसंदर्भातील कोणतेही आजार असेल की, थकवा, सूज किंवा लघवीमध्ये बदल अशी लक्षणं दिसून येतात. नव्या संशोधनातून असं स्पष्ट झालंय की, किडनीच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्यास त्याचे सुरुवातीचे संकेत डोळ्यांमधूनही दिसू लागतात.

डोळे आणि किडनी हे दोन्ही अवयव शरीरातील नाजूक रक्तवाहिन्यांवर आणि द्रव संतुलनावर अवलंबून असतात. त्यामुळे एका अवयवातील समस्या दुसऱ्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे याची लक्षणं डोळ्यांच्या माध्यमातून दिसून येतात.

डोळ्यांमध्ये काही प्रमाणात सूज दिसणं, धूसर किंवा दुहेरी दिसू लागणं, कोरडेपणा, खाज, लालसरपणा आणि रंग ओळखण्यात अडचण येणं ही लक्षणं किडनीच्या गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात. ही लक्षणं सुरुवातीला सौम्य प्रमाणात दिसतात. वेळेवर लक्ष न दिल्यास त्या अधिक तीव्र होतात. विशेषतः थकवा किंवा शरीराच्या इतर भागांतील सूज यांसोबत ही लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

डोळ्यांमधून दिसणारी किडनी आजाराची ५ प्रमुख लक्षणे

डोळ्यांभोवती सतत सूज राहणं

रात्री उशिरा झोपल्यावर डोळ्यांभोवती सूज येणं सामान्य आहे. परंतु जर ही सूज दिवसभर कायम राहिली असेल तर ती प्रोटीन्युरिया नावाच्या स्थितीचं लक्षण असू शकतं. या स्थितीत किडनी खराब झाल्यामुळे लघवीतून प्रोटीन गळून जातं आणि त्यामुळे डोळ्यांभोवतीच्या मऊ टिश्य़ूंचा थर निर्माण होतो

अंधुक किंवा धुसर दिसणं

अचानक दृष्टीमध्ये बदल होणं, फोकस करण्यात अडचण येणं किंवा डबल व्हिजन हे डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याचे संकेत असू शकतात. उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेह हे किडनीच्या आजाराची प्रमुख कारण आहेत आणि हे दोन्ही डोळ्यांच्या रेटिनामधील रक्तवाहिन्यांचे नुकसान करू शकतात.

डोळे चुरचुरणं किंवा खाज येणं

डोळ्यांमध्ये सतत कोरडेपणा, खाज किंवा चुरचुर जाणवणं ही स्थिती असली तरी ते किडनी आजाराचं लक्षणही असू शकतं. किडनीचे आजार किंवा डायलिसिस घेत असलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या सामान्यपणे दिसून येते. शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेट यांचं असंतुलन किंवा अपशिष्ट पदार्थ साचल्यामुळे अशा लक्षणांची निर्मिती होते.

डोळ्यांमध्ये लालसरपणा

डोळ्यांमध्ये लालसरपणा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जसं की थकवा, अ‍ॅलर्जी किंवा संसर्ग. मात्र, किडनी आजाराच्या संदर्भात हा उच्च रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रित न झाल्याचे संकेत असू शकतो. रक्तवाहिन्यांमधील दाब वाढल्यामुळे डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसू शकतो.

रंग ओळखण्यात अडचण येणं

किडनी कार्यात बिघाड झाल्यास काही लोकांना रंग ओळखण्यात सूक्ष्म बदल जाणवू शकतो. विशेषतः निळ्या आणि पिवळ्या रंग ओळखण्यात समस्या जाणवू शकते. हे डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व किंवा रेटिनामधील बदलांमुळे होऊ शकतं. जे दीर्घकालीन उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा युरेमिक टॉक्सिन्समुळे निर्माण होतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...तर त्या पक्षाचा सत्यानाश होतो; केंद्रीय मंत्री आठवलेंनी सांगितला ३५ वर्षांचा इतिहास

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

Bigg Boss 19 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस १९'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? ऑफिस वेळेनंतर नो कॉल-नो ईमेल

SCROLL FOR NEXT