IDBI Recruitment 2024 Job Vacancies For 500 Positions Saam Tv
लाईफस्टाईल

IDBI Recruitment 2024: पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! IDBI बँकेत ५०० जागांसाठी भरती, वयोमर्यादा किती?

IDBI Bank Recruitment 2024 Apply Online: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने नोकरीची उत्तम संधी आणली आहे. जर तुम्ही देखील पदवीधर असाल तर आजच या नोकरीसाठी अर्ज करा.

कोमल दामुद्रे

IDBI Bank Recruitment 2024 Online Application Process:

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने नोकरीची उत्तम संधी आणली आहे. जर तुम्ही देखील पदवीधर असाल तर आजच या नोकरीसाठी अर्ज करा.

IDBI मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ५०० जागांसाठी भरती (Recruitment) सुरु करण्यात आली आहे. या पदासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर अतिंम मुदत ही २६ फेब्रुवारी असेल.

इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट किती, वयोमर्यादा, अर्ज (Application) प्रक्रिया कशी असेल जाणून घेऊया.

1. शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करायला हवे. तसेच संगणात प्राविण्य असणे गरजेचे आहे.

2. वयाची अट

उमेदवाराचे वय २० ते २५ वर्षादरम्यान असायला हवे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

3. निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये उमेदवाराची ऑनलाइन (Online) चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असेल.

4. अर्ज शुल्क

SC/ST/PWD उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर वर्गातील उमेदवारांसाठी हजार रुपये शुल्क असेल.

5. अर्ज प्रक्रिया कशी?

  • उमेदवाराला http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • होम पेजवर जाऊन करिअर लिंकवर क्लिक करा.

  • करंट ओपनिंग्सवर क्लिक करा.

  • पुढील प्रक्रिया प्रोसेस करुन आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT