Frozen Ice Is Formed By Freezing Water Saam Tv
लाईफस्टाईल

Frost In Freezer: ऊन्हाळ्यात पाणी लवकर थंड होण्यासाठी फ्रिज फास्ट केल्याने तयार होतो बर्फाचा डोंगर? तर फॉलो करा 'या' टिप्स

Ice Mountain In Fridge: रेफ्रिजरेटरचा वापर प्रत्येक घरात होतो. उन्हाळ्यात लोकांना याची खूप गरज असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ice Buildup in Your Freezer: रेफ्रिजरेटरचा वापर प्रत्येक घरात होतो. उन्हाळ्यात लोकांना याची खूप गरज असते. भाज्या ताजे ठेवण्यासाठी, दूध दही होण्यापासून रोखण्यासाठी आणि बर्फाचे तुकडे बनवण्यासाठी रेफ्रिजरेटरची आवश्यकता असते. नीट वापरला नाही तर फ्रीजला वास येऊ लागतो आणि जास्त बर्फ तयार होऊ लागतो.

हे विशेषतः जुन्या फ्रीजच्या बाबतीत घडते. नवीन फ्रीजमध्येही तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल, तर तुमच्याकडून त्यात चूक झाली असेल. या टिप्स (Tips) फॉलो करून तुम्ही फ्रीजचे आयुष्य वाढवू शकता.

ओलाव्यामुळे फ्रीजमध्ये बर्फाचा डोंगर तयार होतो. जेव्हा तुम्ही फ्रिज पुन्हा पुन्हा उघडता तेव्हाच ओलावा निर्माण होतो. ओलावा टाळायचा असेल तर गरजेच्या वेळीच फ्रीज उघडा. ते उघडताच बाहेरून गरम हवा आत जाते आणि ती आतल्या थंड हवेत मिसळून ओलावा निर्माण करते.

जर फ्रीजमध्ये जास्त बर्फ जमा होत असेल तर असे होऊ शकते की तुमचा फ्रीज योग्य तापमानावर (Temperature) सेट केलेला नाही. फ्रीजरचे तापमान -18 अंश सेल्सिअस सेट करणे आवश्यक आहे. या तापमानात सेट न केल्यास त्रास होऊ शकतो.

जर तुमचा फ्रीज रिकामा राहिला तर त्यात आर्द्रतेमुळे जास्त बर्फ तयार होतो. शक्य असल्यास, फ्रीज नेहमी सामानाने पॅक करून ठेवा.

फ्रीजच्या मागील बाजूस एक पाईप आहे जो पाण्याचा निचरा करण्याचे काम करतो. जर ते थांबले तर बर्फ अधिक गोठण्यास सुरवात होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता करत रहा.

फ्रीजच्या मागील बाजूस कॉइल कंडेन्सर आहे. यामुळे फ्रिज थंड होतो. ते घाण झाल्यावर फ्रीज नीट काम करू शकत नाही. ते साफ करत राहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT