हल्ली बॉलिवूड सिलिब्रेंटमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. नात्यात दूरावा आल्यानंतर सगळ्यात शेवटचा निर्णय असतो तो विभक्त होणे अर्थात घटस्फोट घेणे.
कोणतेही नाते जोडताना एकमेकांना साथ देण्याची आपण अनेक वचने देतो. परंतु, काही कारणांमुळे नात तुटते. हिंदू संस्कृतीत लग्नाला सात जन्मांचे बंधन मानले जाते. त्यामुळे जोडीदार कसाही वागला तरीही विभक्त होण्याचा निर्णय हा सहज घेतला जात नाही. परंतु, सतत दु:खी राहाण्यापेक्षा वेगळे झालेले बरे असा प्रश्न समोर उभा राहून अनेक जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. पण घटस्फोट घेताना कोणत्या ४ चुका टाळायला हव्या हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. घटस्फोटाची प्रक्रिया समजून घ्या
घटस्फोट (Divorce) घेण्यापूर्वी अनुभवी आणि कौटुंबिक वकीलाचा कायदेशीर सल्ला घ्या. तुमचे अधिकार, जबाबदाऱ्या त्यात समाविष्ट केल्या आहेत का हे ही पाहा. कायदेशीर प्रक्रिया कशी असते हे समजून घ्या.
2. आर्थिक स्थिती समजून घ्या
जोडीदारापासून (Partner) वेगळे होताना तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे देखील तपासा. स्वत:चा खर्च उचलू शकाल निदान इतकी तरी सेव्हिंग असायला हवी. यावेळी तुमची सगळी आर्थिक कागदपत्रे एका ठिकाणी ठेवायला हवी. घटस्फोटानंतर तुम्हाला आर्थिक संपत्ती किंवा मालमत्ता मिळेल याबाबत तुमच्या वकिलाशी चर्चा करा.
3. मुलांचे हक्क समजून घ्या
मुले (Kids) झाल्यानंतर घटस्फोट घेणे सोपे नसते. कारण अनेक जोडपी विभक्त होताना मुलांना समोर ठेवून निर्णय घेतात. अशावेळी त्यांच्या भविष्याचा विचार केला जातो. त्यामुळे चाइल्ड सपोर्ट मिळवण्यासाठी तुमच्या वकिलाची मदत घ्या.
4. प्रत्येक छोट्या गोष्टीत सहभाग आवश्यक
तुमची बाजू मांडण्यासाठी कोर्टात तुमचा वकील असला तरी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत सक्रीय राहाणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या मनात निर्माण होणारा प्रत्येक प्रश्न वकिलाला विचारा. भविष्यात तुम्हाला पटेल तो निर्णय घ्या. वकील तुम्हाला फक्त कायदयाबाबत माहिती देईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.