Successful Relationship Saam TV
लाईफस्टाईल

Successful Relationship : पत्नीच्या 'या' गोष्टींमुळे पती हिंसक होऊ शकतो; आजपासूनच अशा चुका टाळा

Husband and Wife Relationship Tips : पती-पत्नीच्या नात्यात अनेक गोष्टींवरून वाद होत असतो. अशावेळी पतीसह पत्नीच्या या चुकांमुळे पतीच्या मनावर वाईट परिणाम होतो.

Ruchika Jadhav

पती पत्नीचं नातं हे पवित्र नातं मानलं जातं. आयुष्यात आई वडिलांनंतर दोघेही एकमेकांच्या आधाराने आपलं जीवन जगतात. पतीसाठी पत्नी जितकी महत्वाची असते तितकेच पत्नीसाठी पतीही महत्वाचा असतो. दोघांनी एकमेकांच्या विचारांचा आदर केल्यास संसार सुखाचा होतो.

मात्र आजकालच्या पिढीमध्ये पती पत्नीच्या नात्यात सतत भांडणे आणि वाद पाहायला मिळतात. घटनेनुसार व्यक्तींचे स्वभाव बदलतात. पतीने कायम आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहणे, तिच्या सर्व गरजा पूर्ण करणे, पत्नीच्या विचारांचा आदर करणे आणि तिला कायम सन्मानपूर्वक वागणूक देणे गरजेचे असते. अशाच प्रकारे पत्निनेन देखील आपली काही कर्तव्ये पूर्ण करायची असतात.

खोटं बोलणे

अनेक घरांमध्ये पती एकटाच कमवता पुरुष असतो. तर पत्नी गृहिणी असते. अशावेळी आपलं घर आणि घरातील सर्व खर्च पत्नी नीट चालवेल या विचाराने पती पगारातील काही रक्कम पत्नीला देतो. मात्र काही महिला याचा गैरफायदा घेतात आणि जास्तीचे पैसे स्वतःकडे साठवतात. असे केल्याने घरखर्च करण्यात पैसे अपुरे पडतात. अशावेळी पत्नीने पैशांच्या बाबतीत पतीशी खोटं बोलू नये.

सासू सासऱ्यांचा आदर न करणे

काही महिलांना फक्त राजा राणीचा संसार म्हणजे फक्त पती आणि आपण एकत्र रहावं असं वाटतं. महिलांना सासू सासरे नको असतात. आपल्या आई वडिलांचा आपल्या पत्नीने आदर करावा असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. ज्यावेळी पत्नी सासू सासऱ्यां आदर करत नाही त्यावेळी पतीच्या मनात तिच्याविषयी द्वेष निर्माण होतो.

वेळेत जेवण न देणे

अनेक ठिकाणी गृहिणी असलेल्या महिला आपल्या पतीसाठी कायम पांचापकवान बनवतात. पती बाहेर काम करत असताना उपाशी राहणार नाही याची काळजी घेतात. मात्र काही महिला सकाळची झोप मोड होऊनये यासाठी पतीला कामावर जाताना साधा जेवणाचा डब्बा देखील बनवून देत नाहीत. असे केल्याने देखील पतीचे मन नाराज होते.

सतत वाद

संसारात दोघांनी काही वेळा कमीपणा घ्यावा लागतो. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यास वादात कायम पतीने माघार घ्यावी असे नसते पत्नीने देखील भांडणात माघार घेणे गरजेचे आहे. वाद झाल्यावर आपली बाजू मांडताना शांततेने मांडवी. असे केल्याने पतीच्या मनात पत्नीविषयी आदर आणखी वाढतो.

टीप: ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कामचुकार अधिकाऱ्यांना मेमो काढा! पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार निलेश राणे आक्रमक

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? ३ पदार्थ कोमट पाण्यात मिसळून प्या, रोजचा त्रास होईल बंद

शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

SCROLL FOR NEXT