Shreya Maskar
सकाळी उठल्यावर तुमचे पोट साफ होत नसेल तर हा घरगुती उपाय आवर्जून करा. ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल आणि कोणतीही अस्वस्थता वाटणार नाही.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक हेल्दी ड्रिंक प्या. हे ड्रिंक बनवण्यासाठी इसबगोल , हिरडा पावडर आणि बडीशेप हे तीन पदार्थ लागतात. हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी इसबगोल , हिरडा पावडर आणि बडीशेप हे तीन घटक २५० ते ३०० मिली कोमट पाण्यात मिसळा.
हे पेय दररोज रात्रीच्या जेवणानंतर सुमारे १ ते २ तासांनी पिऊ शकता. हे नियमितपणे प्यायल्याने आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसेल.
इसबगोलमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. हे पाणी शोषून घेऊन शौचाला मऊ करण्यास मदत करते, ज्यामुळे शौचास जाणे सोपे होते.
पचनाच्या समस्यांसाठी आयुर्वेदात हिरडाचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. ते पोट स्वच्छ करण्यास आणि पचनक्रियेस मदत करू शकते.
बडीशेप पोटातील गॅस कमी करण्यास मदत करते. बडीशेप पोटाला थंडावा देते आणि पचनक्रिया सुधारते. हे तीन घटक एकत्र मिळून पोट स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. जास्त तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा, तसेच अति चहा आणि कॉफीचे सेवन टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.