Weight Loss Transformation  google
लाईफस्टाईल

Weight Loss : व्यायाम आणि डाएट शिवाय ३५ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या गुपित

Weight Loss Transformation : ७ महिन्यांत ३५ किलो वजन घटवणाऱ्या महिलेने कोणते अन्न टाळले आणि कोणती गोष्ट पाळली हे जाणून घ्या. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला प्रेरणादायी प्रवास.

Sakshi Sunil Jadhav

  • महिलेने कोणताही व्यायाम न करता ७ महिन्यांत ३५ किलो वजन कमी केलं.

  • फक्त विशिष्ट पदार्थ टाळून तिने हे परिवर्तन साध्य केलं.

  • ग्रॅनोला, फ्लेवर्ड दही, पॅकेज्ड ज्यूस आणि डाएट नमकीन टाळल्यामुळे यश मिळालं.

  • संतुलित आहार, योग्य माहिती आणि सातत्यामुळे तिचा ट्रान्सफॉर्मेशन व्हायरल झाला.

वजन कमी करणे हे आजच्या धकाधकीच्या जीवनात खूपच मोठं आव्हान आहे. रोजच्या जेवणात काय खावं आणि काय टाळावं, याबाबत सल्ल्यांची भरमार असली तरी, अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे प्रयत्न अयशस्वी होतात. मात्र अलीकडेच एका महिलेने केवळ ७ महिन्यांत ३५ किलो वजन कमी केल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे या महिलेने वजन कमी करण्यासाठी कोणताही कठोर व्यायाम किंवा महागडा आहार पाळलेला नाही. ती म्हणते की, वजन कमी करण्यासाठी तिने काही पदार्थ खाणं पूर्णतः थांबवलं, हेच तिचं यशाचं एक गुपित आहे. तिच्या या शरीरपरिवर्तनाचा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, त्यात 'पूर्वी आणि नंतर' असे फोटोही आहेत.


सुरुवातीच्या फोटोंमध्ये तिचं शरीर स्थूल वाटत होतं. मात्र नंतरच्या फोटोंमध्ये ती एकदम सडपातळ, तंदुरुस्त आणि आत्मविश्वासाने भरलेली दिसते. व्हिडिओमध्ये तिने स्पष्ट केलं की तिने काही विशिष्ट अन्नपदार्थ टाळले आणि त्याचा सकारात्मक परिणाम शरीरावर दिसू लागला. वजन कमी करण्यासाठी तिने सगळ्यात आधी आपल्या आहारातून ग्रॅनोला, फ्लेवर्ड दही आणि पॅकेज्ड फळांचे रस काढून टाकले. ही सर्व खाद्यपदार्थ ‘निरोगी’ म्हणून विकले जात असले, तरी त्यात लपलेली साखर आणि तेल शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

तिने इतरही प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की, डाएट नमकीन, बेक्ड चिप्स, प्रोटीन बार, मध, गूळ, ब्राऊन ब्रेड, स्मूदीज, लो-फॅट पॅकेज्ड अन्न आणि अतिसेवनात घेतलेले सोया उत्पादने टाळली. तिच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी केवळ फॅटी फूड कमी करणे पुरेसे नाही, तर काय खातोय आणि त्यात काय मिसळलं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

या महिलेचा आहार नियंत्रित होता, पण त्याचवेळी संतुलितही होता. वजन कमी करताना ती उपाशी राहत नव्हती, तर चुकीच्या पदार्थांचे सेवन थांबवून ती योग्य पर्याय निवडत होती. इंटरनेटवर मिळणाऱ्या लाखो सल्ल्यांपेक्षा स्वतःच्या शरीराचा अभ्यास करून आणि साधे नियम पाळून तिने मिळवलेलं यश अनेकांना प्रेरणा देणारं आहे.

महिलेने वजन कसं कमी केलं?

तिने कोणताही व्यायाम न करता, केवळ आहारातील काही अन्नपदार्थ टाळून वजन कमी केलं.

वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या?

ग्रॅनोला, चव असलेले दही, पॅकेज्ड ज्यूस, डाएट नमकीन, प्रोटीन बार, ब्राऊन ब्रेड, स्मूदी, मध-गूळ, लो-फॅट फूड्स आणि सोया उत्पादने.

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं आवश्यक आहे का?

नाही. ती उपाशी राहिली नाही, फक्त अयोग्य पदार्थ टाळले आणि संतुलित पर्याय निवडले.

तिचा व्हिडिओ कुठे शेअर केला गेला?

तिने तिचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि तो व्हायरल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT