Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips: घरच्या घरीच करा वजन कमी, जाणून घ्या संपुर्ण डाएट प्लान

Weight Loss Diet: वाढलेली पोटाची ढेरी कोणालाच आवडत नाही. त्यात आपले वजन झटक्यात कसं वाढतं हे सुद्धा बऱ्याच जणांना कळत नाही. चला तर जाणून घेवू कोणत्या फळांच्या ज्युसचे सेवन केल्याने वजन कमी होते.

Saam Tv

वाढलेली पोटाची ढेरी कोणालाच आवडत नाही. त्यात आपले वजन झटक्यात कसं वाढतं हे सुद्धा बऱ्याच जणांना कळत नाही. मग त्याने शरीरावर काही परिणाम जाणवला जसे की, उठता बसता न येणे, आळस येणे, चालताना दम भरणे तेव्हा आपण आपले वजन कमी करण्यासाठी उपाय शोधायला जातो. सुरुवातीला आपण घरच्या घरी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यात कोणकोणत्या फळांचा वापर केला पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत.

शरीरासाठी फळे खूप महत्वाची असतात. फळांच्या सेवनाने शरीराला हवे असलेले आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यात आपण फक्त कच्ची फळे नाही तर ज्युसचा वापर सुद्धा करू शकतो. मात्र हा ज्युस घरी तयार केलेला असला तर त्याचा जास्त फायदा शरीराला होतो.तसेच वजन कमी होण्यासाठी खूप फायदा होतो. चला तर जाणून घेवू कोणत्या फळांच्या ज्युसचे सेवन केल्याने वजन कमी होते.

गाजर

गाजरात असलेल्या कॅलेरीज आणि फायबरचा आपला शरीरावर चांगलाच परिणाम होतो. गाजराचा रस प्यायल्याने जास्त काळ पोट भरलेले राहते. तसेच पित्त स्त्राव वाढवण्याचे सुद्धा काम गाजराने होते. किमान १ ते २ ग्लास गाजराचा रस दिवसातून घ्यावा.

टरबूज

टरबूजाचा रस हा स्वस्थ आहार आणि व्यायामासोबत रोज सेवन केल्याने शरीरातील फॅट कमी होतो. किमान १ ग्लास टरबूजाचा रस दिवसातून घ्यावा.

डाळींब

डाळींबाचा रस तुमच्या आहारानंतर घेतल्याने तुमच्या शरीराला खूप फायदा होतो. तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू पाणी

तुम्ही रोज प्रवासात, किंवा धावपळीच्या जीवनात घरी तयार केलेले लिंबू पाणी सेवन करू शकता. त्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहिल.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही इतर घरगुती उपाय करू शकता ते पुढील प्रमाणे आहेत.

फायबरयुक्त पदार्थ पचनासाठी मदत करतात आणि पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे फळांचा आहारात समावेश असू द्या. दररोज ३०-४५ मिनिटे व्यायाम करा. त्यात तुम्ही चालणे, सायकलिंग, योगा किंवा झुंबा यासारखे व्यायाम प्रकार करा. दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या, हे मेटाबॉलिझम वाढवते. गोड पदार्थ, पेस्ट्री, सोडा आणि जंक फूड खाणे कमी करा. रात्री उशिरा खाणे टाळा. अल्कोहोल आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड कमी करा. झाडलोट, फरशी पुसणे, कपडे धुणे यामुळेही कॅलरीज बर्न होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT