वजन कमी करणाऱ्यांसाठी न्यूट्रिशनिस्टने खास हेल्दी बिर्याणी रेसिपी शेअर केली.
कमी तूप, जास्त प्रथिने आणि ग्रीक योगर्टचा वापर कमी केला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
बिर्याणी ही सगळ्यांच्याच आवडीची डिश असते. घरात कोणाचा बर्थडे असो किंवा खास प्रसंग जेवणाच्या मेन्यू ठरवताना बिर्याणी पहिली लक्षात येते. पण पारंपरिक पद्धतीने तयार केलेली बिर्याणी ही तुप, तळलेले कांदे आणि बासमती तांदळात तयार केली जाते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ती वजन नियंत्रित ठेवणाऱ्यांसाठी फारशी योग्य मानली जात नाही. लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक आजाराचं प्रमाण वाढत असताना, अनेक आहारतज्ज्ञ आता पारंपरिक पदार्थांना आधुनिक आणि संतुलित स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढे आपण अशाच प्रकारे न्यूट्रिशनिस्ट आणि वजन नियंत्रण तज्ज्ञ मोहिता मास्करेन्हास यांनी एक खास वेट लॉस फ्रेंडली बिर्याणी रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी चवीचा अप्रतिम आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली आहे. त्यामध्ये कमी तूप, जास्त प्रथिने आणि योग्य प्रमाणातील प्रोबायोटिक वापरावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या मते बिर्याणीची मजा घेतानाही आरोग्याचं भान ठेवणं शक्य आहे. फक्त प्रमाण आणि साहित्याची निवड योग्य असावी.
पारंपरिक बिर्याणीमध्ये जास्त तूप, तेल आणि फॅटी मांस वापरलं जातं. एक चमचाभर तुपातच सुमारे 120 कॅलरीज असतात आणि त्याने शरीरातील फॅट वाढतो. लॅन्सेटच्या जर्नलमधील संशोधनानुसार, जास्त फॅट्स असलेला आहार वजन वाढवू शकतो आणि एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळीही वाढवतो. रेस्टॉरंट-स्टाईल बिर्याणीमध्ये तळलेले कांदे, फुल-फॅट दही आणि क्रीम वापरलं जातं, त्यामुळे कॅलरी डेन्सिटी आणखीन वाढते.
आहार तज्ज्ञांनी पुढे बिर्याणी करण्याच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यामध्ये तयार केलेल्या हेल्दी बिर्याणी रेसिपीमध्ये काही महत्त्वाचे बदल करायचे आहेत. सगळ्यात आधी तुपाचं प्रमाण कमी करून, चिकन ब्रेस्टसारखा कमी फॅट असलेला प्रोटीनचा भाग वापरायचा आहे. दहीसाठी लो-फॅट ग्रीक योगर्टचा वापर करू शकता.
तसेच तळलेले कांदे खूप कमी प्रमाणात घ्यायचे आहेत. बिर्याणीला पारंपरिक सुगंध आणि लेयरिंग ठेवायची. यातून तुम्हाला किमान ४०० कॅलरीज मिळतील. सोबत दिलेलं लो-फॅट ग्रीक योगर्टचा रायता हे या जेवणाला जास्त पौष्टिक बनवतं. यात प्रोबायोटिक्स असल्याने पचन सुधारतं आणि पोट भरतं. ही हेल्दी बिर्याणी फक्त चविष्टच नाही, तर वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये एक गिल्ट-फ्री ट्रीट ठरू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.