Office Style for Women google
लाईफस्टाईल

Office Style for Women: कामाच्या ठिकाणी बदला कपड्यांची स्टाईल, एक्सपर्टने सांगितल्या महिलांसाठी खास टिप्स

Professional Dressing: एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरून त्याच्या मन: स्थितीबद्दल बरंच काही कळू शकतं. याचाच अर्थ तुमचे कपडे तुमच्या स्वभावाचा आणि व्यक्तीमत्वाचा आरसा असतो.

Saam Tv

एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरून त्याच्या मन: स्थितीबद्दल बरंच काही कळू शकतं. याचाच अर्थ तुमचे कपडे तुमच्या स्वभावाचा आणि व्यक्तीमत्वाचा आरसा असतो. दैनंदिन जीवनात तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही परिधान करू शकता. पण कामाच्या ठिकाणी ते अयोग्य ठरू शकतं. ऑफीस वेअर निवडताना हे अधिक महत्वाचं असतं. तिथे तुम्हाला प्रोफेशनल लूकमुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढू शकतो. त्यासोबत तुम्हाला चांगल्या पर्सनॅलिटीचे सुद्धा मानलं जातं. म्हणूनच तज्ज्ञ काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या कपड्यांना पॉवर ड्रेसिंगनुसार तयार करण्याचा सल्ला देतात. जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी वेगळे आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून दिसाल.

पॉवर ड्रेसिंगचे महत्व

माणसाच्या बोलण्यापुर्वी त्याचे कपडे संवाद साधतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा त्याचा पोशाख आणि हावभाव त्या व्यक्तीबद्दल मत तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पण जर जर तुम्ही नेहमीचे आकर्षक न दिसणारे, अस्वच्छ कपडे घातले तर आपल्याला समोरचा व्यक्ती भित्रा, आळशी आणि आत्मविश्वास कमजोर असलेला व्यक्ती म्हणून आपल्या बोलण्याआधी ठरवतो. यासाठी तुम्ही तुमच्या कपाटात कोणत्या गोष्टींचा वापर करावा या बद्दल आम्ही सांगणार आहोत.

कपड्यांच्या फिटींगकडे लक्ष द्या

सध्या महिला ऑफीससाठी शक्यतो रेजिमेड कपडे विकत घेतात. हे कपडे त्यांच्या फिटींगचे नसतात. त्यामुळे तुम्ही फीटींगचे कपडे तुमच्या मापाने शिवून घातलेत तर तुम्हाला ते परफेक्ट आणि कंफर्टेबल होतील. तसेच तुम्ही ऑफीसमध्ये वावरताना बिनधास्त वावराल. तितकेच तुम्ही आकर्षक आणि कॉन्फीडंट दिसाल.

एक्सेसरीज

तुम्हाला ऑफीसमध्ये आकर्षक दिसण्यासाठी तुमच्या रोजच्या वापरातल्या एक्सेसरीज खूप फायदेशीर ठरतात. पण तुम्ही फॉरमल वेअर करता. अशा वेळेसही तुम्ही बारिक नाजूक चैन, छोटे छोटे कानातले आणि आकर्षक रिंगचा वापर करू शकता.

रंगांचे गणित

तुमच्या कपड्यांच्या रंगांवरून सुद्धा तुम्हाला पारखलं जातं. त्यामुळे ऑफीसमध्ये शक्यतो तुम्ही नारंगी, लाल, डार्क निळा असे रंग टाळावेत. मग त्याऐवजी तुम्ही न्यूट्रल रंगांचा वापर करू शकता. तसेच तुम्ही ऑफीसमध्ये वावरताना हसत वापरले पाहिजे. सगळ्यांना बघून स्माईल केलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT