Mobile Saam Tv
लाईफस्टाईल

मोबाईलचा लॉक पॅटर्न विसरलात? डेटा न गमावता असा करा अनलॉक

आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगू ज्याद्वारे तुमचा फोन देखील अनलॉक केला जाईल आणि डेटा डिलीट होणार नाही.

Shivani Tichkule

आज जवळपास सर्वच जण फोन वापर करतात.  फोनच्या सुरक्षेसाठी पिन, पॅटर्न किंवा पासवर्ड ठेवतात.  तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुम्ही कधीच डिलीट करू इच्छित नाही, परंतु जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा (Smart Phone) पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात आणि फोन रीबूट करावा लागला तर? तुमचा सर्व डेटा डिलीट होऊ शकते. पण काळजी करू नका, आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगू ज्याद्वारे तुमचा फोन देखील अनलॉक केला जाईल आणि डेटा डिलीट होणार नाही. (Latest Technology News)

हे देखील पहा -

असा करा फोन अनलॉक

1: तुमच्या Windows किंवा macOS कॉम्प्युट वरून DroidKit हे अॅप डाऊनलोड आणि इंस्टॉल करा.

2: त्यानंतर, DroidKit अॅप लाँच करा आणि 'अनलॉक स्क्रीन' या पर्यायावर वर क्लिक करा.3: त्यानंतर, तुम्ही USB केबल वापरून तुमचा Android फोन कॉम्प्युटरसोबत जोडा. एकदा ते कनेक्ट झाल्यानंतर, 'स्टार्ट' या पर्यायावर क्लिक करा.

4: त्यानंतर प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर Ready Device Configuration File उघडेल. कॉन्फिगरेशन प्रोसेसची स्थिती यामुळे दिसेल.

5: कॉन्फिगरेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला सूचित केले जाईल. त्यानंतर, तुम्हाला Remove Now या पर्यायावर वर क्लिक करावे लागेल.

6: तुमचा Android फोन ब्रँड निवडा आणि Next वर क्लिक करा

7: त्यानंतर तुम्हाला तुमचे डिव्हाइस रिकव्हरी मोडमध्ये ठेवावे लागेल आणि कॅशे पार्टिशन हटवावे लागेल. तुमच्या विशिष्ट फोनसाठी निर्मात्याच्या सूचनांचे अनुसरण करा आणि तुमच्या स्मार्टफोनवर प्रक्रिया करा.

8: ते पूर्ण झाल्यावर, तुम्हाला प्रोग्रेस बारवर Removing Screen Lock हा पर्याय मिळेल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचा फोन अनलॉक करू शकता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT