Mumbai Local: पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे श्रेय कुणीही घेऊ नये, ते श्रेय मोदींचेच - रावसाहेब दानवे

Raosaheb Danve On Mumbai Local: शिवसेनेने देखील खासदार श्रीकांत शिंदे यांचे दिव्यात बॅनर लावून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले होते, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Mumbai Local: No one should take credit for the fifth-sixth railway line, that credit belongs to Modi - Raosaheb Danve
Mumbai Local: No one should take credit for the fifth-sixth railway line, that credit belongs to Modi - Raosaheb Danveप्रदीप भणगे
Published On

दिवा : गेल्या अनेक वर्षापासून पाचव्या सहाव्या रेल्वे लाईनचे (Mumbai Local) काम हे रखडले होते. मात्र ते आता पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ऑनलाईन पद्धतीने केले. दरम्यान या कामाचे श्रेय कोणी घेऊ नये, हे श्रेय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार कपिल पाटील, आमदार यांना जाते असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिव्यात केले आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे दिवा स्थानकात येताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दिवा स्टेशनवरील प्रवाशांना आणि भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मराठीतून संवाद साधला - जय भवानी जय शिवाजी...वंदे मातरम....या घोषणा देत त्यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. (No one should take credit for the fifth-sixth railway line, that credit belongs to Modi - Raosaheb Danve)

हे देखील पहा -

दरम्यान गेल्या दोन तीन वर्षापासून कल्याण लोकसभा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाचवी आणि सहावी लाईन लवकर चालू व्हावी व त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करीत होते आणि आज लाईन पूर्ण होताच दिवा स्टेशनवर शिवसेनेने जोरदार बॅनरबाजी केली आहे. याचे श्रेय शिवसेनेला जाऊ नये म्हणून भाजपने बॅनर तर लावलेच आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार कपिल पाटील, विनय सहस्त्रबुद्धे यांचे ढोल वाजवत जंगी स्वागत दिवा रेल्वे स्थानकात करण्यात आले. शिवसेनेने श्रेय घेण्याआधीच भाजपने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार कपिल पाटील, विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज ठाणे ते दिवा असा लोकल प्रवास केला आणि दिवा स्टेशनवर उतरताच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी लोकांशी संवाद साधला. तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की याचे श्रेय कोणी घेऊ नये, हे श्रेय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार कपिल पाटील, आमदार यांना जाते. आता याला शिवसेनेकडून काय उत्तर येते हे पहावे लागेल.

दरम्यान दिवा रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेनेने खासदार डॉ. शिंदे यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकविले. याला प्रतिउत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर शेजारीच झळकाविले. ठाणे ते दिवा ५ व ६ वी रेल्वे लाईन चे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठई निधी कमी न पडू देता लोकांच्या सेवेसाठी कायम अग्रस्थानी असणाऱ्या मोदी सरकारच्या रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com