Foot care during Ganpati Visarjan saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Foot care during Ganpati Visarjan: दहा दिवसांच्या गणपती उत्सवानंतर, अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. या दिवशीची गणपती मिरवणूक खूप मोठी असते आणि त्यात अनेक तास उभे राहावे लागते, चालावे लागते आणि नाचायलाही लागते.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणपती विसर्जनात पायांची काळजी घ्यावी.

  • आरामदायी चप्पल घालणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

  • मिरवणुकीत पायांना विश्रांती द्यावी.

आज संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. १० दिवस बाप्पाची मनोभावे पुजा केल्यानंतर आज त्यांचं साश्रू नयनांनी विसर्जन केलं जाणार आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक म्हणजे ढोल-ताशांचा गजर, उत्साह, नृत्य आणि भक्तीने भारलेलं वातावरण.

अनेकजण या भक्तीत तल्लीन होऊन नाचतात. मात्र यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरून नका. मिरवणूकीदरम्यान आणि नंतर तुम्ही आरोग्याची कशी काळजी घ्यावी ते पाहूयात.

गणपती विसर्जनाच्या या आनंदसोहळ्यात पायांवर सतत ताण येतो. तासनतास चालणं, उभे राहणं, नाचणे आणि गर्दीतून पुढे जाणे यामुळे पायांना त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे विसर्जनात सहभागी होताना आरोग्याची, विशेषतः पायांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

मिरवणुकीत पायांची काळजी कशी घ्यावी?

मिरवणुकीच्या आधी आरामदायी आणि पायांना योग्य बसणारे बूट किंवा चप्पल घालणं महत्त्वाचे आहे. कठीण रस्ते, खडी किंवा घाण जमिनीवर अनवाणी चालल्याने पायाला जखमा, चिरे किंवा संसर्ग होऊ शकतो. सतत नाचल्याने पायाच्या स्नायूंना थकवा येतो, त्यामुळे दर काही वेळाने पायांना विश्रांती देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणी पिणं आणि शरीर हायड्रेट ठेवणे हे देखील पायातील आकडी टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.

मिरवणुकीनंतर कोणते त्रास होऊ शकतात?

अनेकदा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी लोकांना पाय सुजणं, स्नायूंमध्ये ताण येणं किंवा वेदना जाणवणं हा सामान्य अनुभव येतो. काही वेळा फोड येणं, टाच दुखणे किंवा पायाच्या बोटांमध्ये जखमा होऊ शकतात. गर्दीत धावपळ केल्यामुळे टाच मुरगळणं किंवा पाय मोच येणं अशी दुखापत होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे दीर्घकाळ पाय ओले राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.

विसर्जनानंतर काय करावे?

मिरवणुकीनंतर घरी परतल्यावर कोमट पाण्यात मीठ घालून पाय भिजवले तर थकवा कमी होतो. जर सूज आली असेल तर थंड पाण्याच्या पॅकने शेक दिल्यास आराम मिळतो. फोड किंवा जखम आढळल्यास त्यावर तातडीने मलम लावणं आणि पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवणं आवश्यक आहे. त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गणपती विसर्जनादरम्यान पायांची काळजी का घ्यावी?

तासनतास चालणे, नाचणे आणि उभे राहण्यामुळे पायांना त्रास होतो.

मिरवणुकीत कोणती चप्पल घालावी?

आरामदायी आणि पायाला योग्य बसणारी चप्पल घालावी.

मिरवणुकीनंतर पायांचा थकवा कमी करण्यासाठी काय करावे?

कोमट पाण्यात मीठ घालून पाय भिजवावेत.

पायांना सूज आल्यास काय करावे?

थंड पाण्याच्या पॅकने शेक द्यावा.

विसर्जनानंतर फंगल इन्फेक्शनचा धोका का वाढतो?

दीर्घकाळ पाय ओले राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT