मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. SAAM TV
लाईफस्टाईल

स्क्रिन टाइमचा अतिवापर; अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी...

डोळे निरोगी ठेवण्यासाठी स्क्रीन टायमिंगपासून मुलांच्या आहारापर्यंत काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आजकाल मुलं (Child) आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्ही पाहण्यात घालवतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्याबरोबरच डोळ्यांवरही होतो. अशा परिस्थितीत डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी स्क्रीन टायमिंगपासून मुलांच्या आहारापर्यंत काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोरोनाच्या युगात ऑनलाइन (Online) क्लासेसपासून ते शाळेच्या गृहपाठापर्यंत मुलांचा बहुतांश वेळ स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर जातो. त्याच वेळी, उर्वरित वेळ टीव्ही पाहण्यात आणि व्हिडिओ गेम खेळण्यात घालवत आहे. शाळा (School) सुरु झाली असून देखील मुलांना अजूनही त्याची सवय आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

डोळे हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे अनेक वेळा डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही या सर्व समस्या टाळू शकता.

अशी घ्या डोळ्यांची काळजी

१. अक्षर मोठे करुन वाचा - फोन किंवा कम्प्युटरवर शाळेचा अभ्यास करताना मुले अनेकदा लहान अक्षरे आंधळेपणाने वाचतात. त्यामुळे त्यांना असे करण्यापासून थांबवा व स्क्रिन झूम करण्यास सांगा म्हणजेच अक्षरे मोठी करुन वाचाल्यास त्यांच्या डोळ्यांवर फारसा परिणाम होणार नाही.

२. वेळ निश्चित करा - जर तुमची मुले स्क्रीनवर बराच वेळ घालवत असतील तर त्यांच्या डोळ्यांसाठी तसेच आरोग्यासाठीही हानिकारक आहे. अशा परिस्थितीत मुलांसाठी स्क्रीन टाइमिंग निश्चित करा आणि त्यांना ठराविक वेळेनंतर स्क्रीन पाहण्यापासून रोखा.

३. वेळच्या वेळी डोळ्यांची तपासणी करायला विसरू नका- डोळ्यांचे आरोग्य हा मुलांच्या नियमित तपासणीचा एक भाग बनवा आणि वेळोवेळी मुलांच्या डोळ्यांची तपासणी करायला विसरू नका. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची स्थिती कळेल आणि डोळ्यांशी संबंधित गंभीर समस्यांपासून वेळीच उपचार करता येईल.

४. आहारात पोषक तत्वांचा समावेश करा - डोळे निरोगी ठेवण्यासाठी मुलांच्या आहारात जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त आहार असायला हवा. यासाठी मुलांच्या आहारात दूध, दही, गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा.

५. दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करा - मुले अनेकदा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत आळशीपणा दाखवू लागतात. अशा परिस्थितीत मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाला त्यांच्या दिनचर्येचा भाग बनवणे आवश्यक आहे. तसेच या काळात मुलांना डोळ्यांचे व्यायाम करायला सांगा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT