How to take care of teeth, teeth problem, teeth care tips in Marathi,  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पांढऱ्या शुभ्र दातांची काळजी कशी घ्याल ?

या टिप्स फॉलो करुन उन्हाळ्यात दातांची काळजी घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत (Holiday) आपण बऱ्याच पर्यटन स्थळांना भेट देत असतो. अधिक उष्णतेमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. नवनवीन खाद्यपदार्थ, पेये यांचा आपण आहारात अधिक समावेश करतो. (How to take care of teeth)

हे देखील पहा -

उन्हाळयाच्या सुट्टीत आपण बऱ्याचदा आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही. ज्यामुळे नकळत आपण दातांचे दुखणे ओढवून घेतो. तसेच जर आपण तोंडाची योग्य स्वच्छता राखली नाही तर आपल्याला तोंडाच्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. उन्हाळ्यात मौजमजा करताना तोंड आणि दात नेहमी निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करायला हव्या.

या टिप्स फॉलो करा - (Teeth care tips in Marathi)

१. आपण दिवसातून दोनदा दात घासायला हवे आणि दिवसातून एकदा फ्लॉस केल्यास दातांना मजबूत आणि निरोगी ठेवता येईल. बदलत्या हवामानामुळे आपण अधिकतर साखरयुक्त पदार्थ आणि पेयाचे सेवन करतो. त्यामुळे दातदुखीचा त्रास सुरु होतो. (How to care health of your teeth in the summer season)

२. उन्हाळ्यात आपण अधिक हायड्रेटेड राहातो. दातांच्या स्वच्छतेसाठी (Clean) आणि एकूणच आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे अधिक गरजेचे आहे.

३. उन्हाळ्यात आपण कँडी, बेक केलेले पदार्थ (Food) आणि इतर प्रकारच्या मिठाईचे अधिक प्रमाणात खाणे टाळले पाहिजे. साखरमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते.

४. मद्यपान आणि धूम्रपानाच्या सवयीमुळे हिरड्यांचे आजार, हिरड्यांचे ऊतींचे नुकसान, हाडांची झीज आणि दुर्गंधी यांसारखे दुखणी उद्भवतात. आपले मौखिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर आपल्याला धूम्रपान थांबविण्याचा सल्ला देतात.

या गोष्टी लक्षात ठेवून दातांची काळजी घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT