Skin Care problem, Skin care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

प्रवासात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

आपल्या त्वचेची आपण सगळे व्यवस्थितरित्या काळजी घेत असतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या त्वचेची आपण सगळे व्यवस्थितरित्या काळजी घेत असतो. त्वचा आपल्या शरीराचा नाजूक अंग आहे त्यामुळे त्याची काळजी न घेतल्यास आपल्या त्वचेच्या अनेक विकारांना सामोरे जावे लागते.

हे देखील पहा -

प्रवासात त्वचेची काळजी घेणे कठीण असते. प्रवासात फ्रेश राहणे व दिसणेही अवघड होते. चेहरा वारंवार धुतला तर त्वचेवर असणारा तेलकटपणा निघून जातो. तो आपल्या त्वचेसाठी अधिक गरेजेचा आहे. यासाठी कुठेही उपयोगी पडू शकतील असे सौंदर्य प्रसाधने आपण आपल्या स्वतःसोबत ठेवू शकतो. आपल्याला सर्वांत गरजेचे असते स्वत:ला फ्रेश वाटावे यासाठी आपण मॉइश्चरायझर, लिप बाम, लिप ग्लॉस आदी वस्तू सोबत ठेवायला हवे. फक्त मेकअपनेच आपण फ्रेश दिसणार नाही तर त्यासोबत गाढ झोपही हवी असते. यामुळे आपले डोळे सुजल्यासारखे दिसणार नाहीत व आपण फ्रेश दिसाल.त्यासाठी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.

१. चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर पहिली आणि सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी चेहरा मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण बाहेर असता तेव्हा त्वचा रुक्ष आणि फुटल्यासारखी वाटते. अशा वेळी प्रवासापूर्वी व प्रवास करताना चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.

२. मॉइश्चरायझर केल्यानंतर चेहऱ्यावर फाउंडेशन लावू नका फाउंडेशन चेहऱ्याला ड्राय लूक देते. यासाठी प्रवासात चेहऱ्यावर फाउंडेशनऐवजी क्रीम लावावे. जर फाउंडेशनच लावू इच्छित असाल तर त्याआधी ट्रिमर लावा. यामुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होईल.

३. लिपस्टिक लावल्याने आपले ओठ कोरडे वाटू लागतात. अशा वेळी लिप बाम व लिप ग्लॉसचा वापर करायला हवा.

४. चेहऱ्या धुण्यापूर्वी आधी आपल्याला हाताना स्वच्छ करायला विसरु नका. चेहरा मळक्या हाताने धुतल्यास चेहऱ्यावर पिंपल येण्याची शक्यता अधिक असते.

५. प्रवासात त्वचा कोरडी पडते. तसेच डोळ्यांखाली सूजही येऊ लागते. अशावेळी अंडर आय क्रीम लावून आपण स्वतःला संपूर्ण दिवस टवटवीत ठेवू शकतो.

६. प्रवासात लॅपटॉप वा फोन (Phone) अधिक पाहिल्यामुळे डोळे (Eye) लाल होतात आणि पूर्णपणे थकून जातात. त्यामुळे डोळ्यांना सूजही येते. हे टाळण्यासाठी या काळात फोन व लॅपटॉप पाहणे टाळा आणि परिपूर्ण झोप घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT