which food harm your child tooth, Child Care Tips in Marathi, Cavity Tips, Child Teeth Care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Child Teeth Care: वाढत्या वयात मुलांच्या दातांची काळजी कशी घ्याल ?

मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी पालक म्हणून आपण बरेच प्रयत्न करत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी पालक म्हणून आपण बरेच प्रयत्न करत असतो. त्यांच्या वाढीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवे. (child tooth decay treatment options)

हे देखील पहा -

मुलांची वाढ योग्यरित्या व्हावी, त्याचे आरोग्य निरोगी असावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. वाढत्या वयात मुले आपल्याकडे खाण्यापिण्याचा अधिक हट्ट करु लागतात त्यामुळे आपण त्यांने ते पदार्थ (Food) खाऊ घालतो त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मुलांना चॉकलेट, चिप्स व बिस्कीट खाण्याची सवय असते व त्यासाठी ते अधिक हट्ट करु लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट त्यांत्या दातांवर होतो. कोणत्या पदार्थ मुलांना (Child) खाऊ देऊ नये जाणून घेऊया.(Child Teeth Care)

१. मुलांना शक्यतो कोल्ड ड्रिंक्स पिण्यास देऊ नका. त्यामुळे त्यांचे दात खराब होऊ शकतात. या पेयांमध्ये अॅसिड असते व ते आपल्या दातांना नुकसान पोहचवते.

२. अनेक वेळा आपण मुलांना सिल बंद असलेले ज्यूस प्यायला देतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला त्याचा फायदा होतो असे आपल्याला वाटत असते. परंतु, प्रिझर्व्हेटिव्ह्ज ज्यूसमध्ये असलेले पदार्थ दातांना चिकटून राहतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

३. डॉक्टर आपल्याला मुलांना व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे खाऊ घालण्यास सांगतात परंतु, लिंबूवर्गीय फळांचे अधिक सेवन केल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेल्या ऍसिडमुळे दातांच्या इनॅमलवर वाईट परिणाम होतो. संत्र्यात याचे प्रमाण कमी असल्यामुळे आपण मुलांना हे फळ खाण्यास देऊ शकतो.

४. मुलांना स्नॅक्समध्ये चिप्स खाण्यास अधिक आवडते. बटाट्याच्या चिप्समध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. दातांमध्ये ते अडकल्यामुळे पोकळीची समस्या सुरू होते. अशावेळी कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर मुलांना दोनदा ब्रश करायला सांगा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

Prarthana Behere: पवित्र रिश्ता फेम प्रार्थना बेहरेविषयी या गोष्टी माहित आहेत का?

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Shubman Gill vs Rohit Sharma : कॅप्टन शुभमन गिलचं विक्रमी शतक; रोहित शर्माच्या वर्चस्वाला सुरुंग

SCROLL FOR NEXT