Spices Preservation Tips Saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Masala Preservation Tips: स्वयंपाकघरातील मसाल्यांना पावसाळ्यात बुरशी लागते ? याप्रकारे करा स्टोअर, वर्षभर टिकतील

Monsoon Kitchen Hacks: आपल्यापैकी बहुतांश स्त्रिया या उन्हाळ्यात साठवणीचे पदार्थ तयार करतात परंतु, पावसाळ्यात ते लगेच खराब होतात. असे का होते जाणून घ्या

कोमल दामुद्रे

How To Store Spices During Rainy Season : पावसाळा म्हटलं की, घरात ओलावा तयार होतो त्यामुळे कुबट वास येतो. स्वयंपाकघरातील पदार्थ खराब होतात. आपल्यापैकी बहुतांश स्त्रिया या उन्हाळ्यात साठवणीचे पदार्थ तयार करतात परंतु, पावसाळ्यात ते लगेच खराब होतात.

या काळात सर्वाधिक खराब होतात ते मसाले. खराब मसाले अन्नपदार्थात वापरल्याने जेवण तर खराब होतेच पण आरोग्याला देखील हानी होऊ शकते. पावसाळ्यात मसाले कसे साठवायचे याविषयी अनेक गृहिणींना माहीत नसते. पण आज आम्ही तुम्हाला सोपी अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने मसाला खराबही होणार नाही व त्याला बुरशीही लागणार नाही जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

मसाले अधिक काळ साठवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा

1. जर तुम्ही अधिक सूर्यप्रकाशात मसाल्याचा (Spices) डब्बा ठेवत असाल तर असे करणे टाळा. सूर्याची अतिनील किरणे हे मसाल्यांसाठी हानीकारक असतात. त्यामुळे मसाल्यांचा सुगंध निघून जातो, ते काळे पडतात.

2. ओलावा व कीटकांपासून मसाले सुरक्षित ठेवण्यासाठी बरेच लोक मसाले फ्रीजमध्ये (Fridge) ठेवतात. यामुळे मसाले काही दिवस टिकतात खरे पण याच्या चवीत बदल होतो. तसेच जर फ्रीजमध्ये मसाले ठेवत असाल तर त्याला एअर-लॉक कंटेनरमध्ये ठेवा.

3. रेडीमेड मसाला आणण्याऐवजी तो अख्खा किंवा खड्या मसाल्याच्या स्वरुपात साठवल्यास तो खराब ही होणार नाही व त्याला किडही लागणार नाही.

4. अनेक गृहिणी पावसाळ्यात एकाच वेळी अनेक मसाले दळण्याची चूक करतात. तसेच ते भल्या मोठ्या बरणीत त्याची साठवणूक करतात. त्यामुळे मसाले खराब होतात. मसाले दळताना त्याचे प्रमाण कमी ठेवा तसेच बरणी देखील छोटी वापरा. ज्यामुळे त्याचा सुगंध व चव दोन्ही टिकून राहातील.

5. स्वयंपाकघरातील (Kitchen) सगळ्या महत्त्वाचा मसाला म्हणजे लवंग. लवंग ही जेवणाची चव वाढवते तसेच ओलावा शोषून घेण्यास मदत करते. जर मीठ किंवा साखरेच्या डब्यात ओलावा तयार होत असेल कापड्याच्या पुरचुंडीत लवंग बांधून ठेवल्यास त्यांना पाणी सुटणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT