Rising Early Morning Saam TV
लाईफस्टाईल

Rising Early Morning : पहाटे लवकर उठण्याचा कंटाळा येतो? मग 'या' टिप्सने चुटकीसरशी जाग येईल

Best Ways Rising Early Morning : काही व्यक्तींना झोप पूर्ण न झाल्याने जास्तप्रमाणात डोकं दुखण्याच्या समस्या जाणवतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी पहाटे लवकर उठण्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत.

Ruchika Jadhav

झोप म्हणजे प्रत्येकासाठी अगदी महत्वाचा विषय. प्रत्येक व्यक्तीला झोप फार प्रिय असते. ऑफिस, कॉलेज, शाळा आणि विविध कामांसाठी प्रत्येत व्यक्तीला सकाळी लवकर उठावे लागते. घर ऑफिसपासून दूर असेल तर त्या व्यक्तीला पहाटे ४ किंवा ५ वाजता सुद्धा उठावे लागते. आता प्रश्न असा आहे की काही असलं तरी सकाळी लवकर उठायला कुणालाही आवडत नाही. पहाटेची साखर झोप प्रत्येक व्यक्तीला हवीहवीशी वाटते.

सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र या सर्व फायद्यांच्या मागे धावताना झोप पूर्ण झाली नाही तर डोकं दुखतं. काही व्यक्तींना झोप पूर्ण न झाल्याने जास्तप्रमाणात डोकं दुखण्याच्या समस्या जाणवतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी पहाटे लवकर उठण्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत.

अचानक बदल करू नका

सकाळी लवकर उठण्याचा निर्णय केल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे उठू नका. पहाटे उठण्याआधी तुम्ही रोज ज्या वेळेत उठता त्याच्या एक तास आधी उठा. असे करत करत तुम्ही पहाटे ४ किंवा ५ वाजता उठण्याची सवय लावू शकता. पहाटे लवकर उठल्याने आपली कामे झटपट उरकतात.

सुंदर गाण्यांचा अलार्म

सकाळी सकाळी चिडचिड होऊ नये यासाठी फोनमध्ये अलार्म लावा. अलार्म ३ वेगवेगळ्या वेळेत लावून ठेवा. सकाळी ४ ला उठायचे असेल तर ३.४५, ३,५० आणि ४ असे अलार्म लावा. याने तुम्हाला सकाळी उठताना झोप पूर्ण झाली नसेल तरी लगेच उठण्याआधी मनाची तयारी करता येईल.

रात्री झोपताना वाचन करा

पहाटे लवकर उठायचे म्हणजे आपल्याला रात्री सुद्धा लवकर झोपणे गरजेचे आहे. त्यामुळे पहाटे उठण्याआधी रात्री लवकर झोपा. लवकर झोप लागावी यासाठी तुम्ही रात्री झोपताना फोन वापरू नका. फोन वापरण्याऐवजी तुम्ही एक पुस्तक वाचण्यास सुरुवात करा. झोपताना डोळ्यांवर फोनची लाईट पडल्याने डोळ्यांवरील ताण आणखी वाढतो. त्यामुळे फोन ऐवजी पु्स्तक वाचण्यास सुरुवात करा.

वेळेचं महत्व समजून घ्या

शाळेत किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास असतो. पाठांतर आणि गणित सर्व विषय सोडवण्यासाठी पहाटे उठणं फायद्याचं ठरतं. पहाटे केलेला अभ्यास चांगल्या पद्धतीने डोक्यात राहतो. तसेच आपली नियोजीत कामे वेळच्यावेळी पूर्ण करता येतात. त्यामुळे सकाळी उठण्याचं महत्व जाणून घेतल्याने आपल्याला मनापासून लवकर उठावे वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT