Remove Mud Stains From Clothes  Saam TV
लाईफस्टाईल

Remove Mud Stains From Clothes : कपडे घासून हात दुखले पण चिखलाचे डाग काही जात नाहीत; वापरा 'या' सिंपल ट्रिंक्स

Mud Stains on Clothes : रस्त्याने जात असताना देखील आपल्या पायांवर ओली माती उडते. चिखलाचे हे हट्टी आणि चिवट डाग सहज निघत नाहीत. ते घालवण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागते.

Ruchika Jadhav

पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावर आणि सर्वत्र माती तसेच चिखल साचलेला असतो. बाहेर जाताना फिरताना आपल्याला याच चिखलातून वाट काढावी लागते. चिखलातून जात असताना किंवा रस्त्याने जाताना देखील आपल्या पायांवर ओली माती उडते. चिखलाचे हे हट्टी आणि चिवट डाग सहज निघत नाहीत. ते घालवण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागते.

सफेद ड्रेस किंवा पँट असेल आणि त्यावर चिख्खल उडाला की तो कितीही घासला तरी निघत नाही. त्यामुळे निर्मापावडर आणि साबणाचा वापर करतात. मात्र तरीही तुमच्या कपड्यांवरील डाग निघत नसतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि भन्नाट टिप्स आणल्या आहेत.

लिंबू आणि मीठ

लिंबाचा रस आणि मीठ एकत्र मिक्स करून घ्या. त्यासाठी आधी मीठ घ्या. त्यात समान प्रमाणात लिंबू रस मिक्स करा. पुढे ही पेस्ट जेथे चिखलाचे डाग असतील तेथे पसरवून ठेवा. त्यानंतर २० ते २५ मिनिटांनी चेक करा आणि कापड धुवून घ्या. ही ट्रिक अतिशय सोपी आणि कमी वेळात रिजल्ट देणारी आहे.

बेकींग सोडा

ज्या कपड्यावर चिखलाचा डाग आहे तो कापड पाण्याने ओला करून घ्या. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा लावा. बेकिंग सोडा लावत असताना सोडा पाण्यात मिक्स करून पेस्ट स्वरुपातच अप्लाय करा. ३० मिनिटे बेकिंग सोड्याची पेस्ट आहे तशीच राहूद्या. त्यानंतर त्यावर डिटर्जंट पावडर टाकून कापड छान वॉश करून घ्या.

व्हिनेगर

काहीवेळा पांढऱ्या पकड्यांवर पडलेला चिकलाचा डाग काही केल्या जात नाही. त्यात कपडे पांढरे असल्याने ते आणखी जास्त खराब दिसते. त्यामुळे अशा डागांवर आधी व्हिनेगर टाकून ठेवा. व्हिनेगर टाकल्यानंतर त्यावर बेकिंग सोडा सुद्धा टाका आणि कापड धुवून घ्या.

चिखलाचे डाग फार जास्त चिवट असतात. त्यामळे ते सहज निघत नाहीत. मात्र वरील काही सिंपल ट्रिक्स वापरून तुम्ही कपड्यांवरील चिखलाचे डाग सहज दूर करू शकता. चिखलांच्या डागांसह कपड्यांवर अनेकदा चहा, कॉफी सुद्धा सांडते त्यावेळी सुद्धा तुम्ही वर दिलेल्या टिप्स फॉलो करून कमी मेहनतीमध्ये कपड्यांवरील डाग सहज घालवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीनंतर सोन्याचे भाव वधारले; चांदीचा दर जैसे थे, आठवड्याच्या शेवटी सोनं कितीनं महागलं?

Maharashtra Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत; 'धनुष्यबाण' घेणार हाती

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

SCROLL FOR NEXT