Mobile Settings : गुपचूप दुसऱ्या मुलींचे फोटो पाहताय? फोनची 'ही' सेटिंग्ज लगेच बदला, गर्लफ्रेंडपासून करेल बचाव

Mobile Settings Changes : स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मग ते बिल भरणे असो किंवा पैसे पाठवणे असो, फोनद्वारे सर्व कामे क्षणार्धात पूर्ण करता येतात.
Mobile Settings
Mobile Settings Saam Tv
Published On

Lock-Unlock Settings :

स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मग ते बिल भरणे असो किंवा पैसे पाठवणे असो, फोनद्वारे सर्व कामे क्षणार्धात पूर्ण करता येतात. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एखादी गोष्ट गुपीत करत असताना कोणीतरी तुम्हाला मागून पाहतय किंवा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड ऐवजी दुसऱ्या मुलींचे फोटो (Photo) पाहचता तेव्हा तुमच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होते. तसेच त्यामुळे तुम्ही घाईघाईत फोन लॉक करता. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला फोनच्या (Phone) अशा काही सेटिंगबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही चालू केल्यास, पुढच्या वेळी असे काही घडल्यास, तुम्हाला लगेच तुम्ही इतरांपासून वाचाल. आणि स्क्रीन दोनदा टॅप करून तुमचा फोन बंद होईल. तुमच्या फोनच्या या सेटिंग्ज अशा प्रकारे बदला.

Mobile Settings
Mobile Users : मोबाईलमध्ये लोक नेमकं काय पाहतात?

सर्व प्रथम फोनची सेटिंग्ज उघडा. यानंतर, तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन टॅप टू वेक किंवा डबल टॅप टू लॉक नावाचा पर्याय शोधावा लागेल. हा पर्याय शोधा आणि तो चालू करा, एकदा हे फीचर चालू झाल्यावर, पुढच्या वेळी तुम्ही फोन स्क्रीनवर दोनदा टॅप कराल, तेव्हा फोनची स्क्रीन लॉक-अनलॉकिंग सुरू होईल.

तसेच काही विपरीत घडले आणि तुमच्या मदतीसाठी आलेल्या लोकांना तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी ही सेटिंग्ज उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्ही खाली नमूद केलेली सेटिंग्ज चालू करावी, अन्यथा कोणीही तुमचा फोन सहज उघडेल. फोनची सुरक्षा कशी वाढवायची? जाणून घ्या.

Mobile Settings
VPN वापरण्याचे आहेत हे फायदे, जाणून घ्या त्याच्या मजबूत सुरक्षतेबद्दल

अशा प्रकारे फोन सुरक्षा वाढवा

डबल टॅप फीचर्सव्यतिरिक्त, इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनची सुरक्षा वाढवू शकता. सुरक्षितता वाढवण्यासाठी, पिन लॉक किंवा पॅटर्न लॉक वापरा. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फेस लॉक-अनलॉक किंवा फिंगरप्रिंट लॉक-अनलॉक हे फीचर्स देखील वापरू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com