Bad Cholesterol Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Bad Cholesterol Symptoms : या चुकीच्या कारणांमुळे वाढते कोलेस्ट्रॉल, कसे कराल कंट्रोल ? जाणून घ्या सविस्तर

How To Reduce Cholesterol : आजकाल धक्काधकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोकांना कॉलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Bad Cholesterol Sign : भारतात कॉलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कॉलेस्ट्रॉल हाय ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, किडणीचे रोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. तर, पहिल्यापासूनच या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी थोडासाही हलगर्जीपणा त्यांची कॉलेस्ट्रॉल लेव्हल, मधुमेह आणि ब्लड प्रेशर कमी-जास्त करु शकतो जे त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.

आजकाल धक्काधकीची जीवनशैली (Lifestyle) आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोकांना कॉलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते. कॉलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरात उपस्थित राहाणारा मेणासारखा पदार्थ आहे.

साधारणतः आपल्या शरीरात चांगले आणि वाईट अशा दोन प्रकारचे कॉलेस्ट्रॉल आळतात. चांगले कॉलेस्ट्रॉल रक्तात साठणारी फॅट कमी करण्यास मदत करते ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या स्वच्छ (Clean) राहातात, ज्यामुळे हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो.

तर वाईट कॉलेस्ट्रॉलची लेव्हल वाढल्यास रक्तातील फॅट रक्तवाहिनीत साठू लागते, ज्यामुळे हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचा प्रवाह अतिशय संथ गतीने होतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack ), स्ट्रोक यांचा धोका वाढतो. कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात परंतु कॉलेस्ट्रॉल काही कमी होत नाही. या मागे अनेक कारणं आहेत. शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कसे कमी कराल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. आहारातील चरबी कमी करणे

शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करणे म्हणजे वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करणे आणि चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवणे. अनेकदा हाय कॉलेस्ट्रॉलचे रुग्ण आहारातील चरबी पूर्णपणे कमी करतात. कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी आहारात ट्रांस फॅट असणारे पदार्थांचे सेवन करणे टाळावे. याउट ऑलिव ऑइल, अक्रोड आणि बदाम यांचे नियमित सेवन करावे. ते शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवते.

2. औषधे न घेणे

कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधे देखील महत्त्वाची महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांचे नियमित सेवन करणे तितकेच आवश्यक असते.

3. डाएट प्लान

शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहाराचे योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की लोक आपल्या आहारात वारंवार बदल करतात. कॉलेस्ट्रॉल लेवल मॅनेज करायचे असेल तर आहार योग्य व पुरक प्रमाणात असणे आवश्यक आहे. योग्य आहार नियोजनाबरोबर तुमच्या आहारात धान्य, ड्रायफ्रुट्स, हेल्दी फॅट, भाज्या इत्यादींचा समावेश हवा.

4. मद्यपान व धुम्रपान न करणे

जर तुम्ही हाय कॉलेस्ट्रॉलचे रुग्ण आहात आणि तरीही मद्यपान आणि धुम्रपान करता तर तुमची कॉलेस्ट्रॉल लेवल वाढू शकते. जर तुम्हाला असे वाटत असेल की फक्त औषधे खाऊन कॉलेस्ट्रॉल सहज कमी होईल तर असे होणार नाही. कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला औषधांव्यतिरिक्त मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळावे लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT