High cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं? डॉक्टरांनी सांगितले 3 साधे आणि सोपे उपाय

High cholesterol control: हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली महत्त्वाची ठरू शकते. डॉक्टर बिमल छाजेर यांनी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारातील बदल, शारीरिक हालचाल आणि वैद्यकीय उपचार कधी आवश्यक ठरतात, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल हाय कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढताना दिसतेय. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वेळीच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचे आहे. आजकाल तरूणांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय.

प्रसिद्ध हृदयाचे डॉक्टर आणि SAAOL Heart Center चे संस्थापक बिमल छाजेर यांच्या मते, शरीरातील कोलेस्ट्रॉल मुख्यतः दोन स्रोतांमधून येते. सुमारे 70 टक्के कोलेस्ट्रॉल आपलं यकृत म्हणजेच लिव्हर तयार करतं. तर जवळपास 30 टक्के कोलेस्ट्रॉल आपण खाल्लेल्या पदार्थांमधून शरीरात जातं. त्यामुळे आहार आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकतं.

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विरघळणारं फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकते. ओट्स, जव, बीन्स, डाळी आणि मटार हे फायबरचे चांगले स्रोत आहेत. याशिवाय सफरचंद, संत्री, बेरीज, पेरू, गाजर, भेंडी, ब्रोकोली आणि हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करता येतो.

या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा

डॉक्टर बिमल छाजेर यांच्या मते, मांसाहार, मासे, अंडी आणि फुल फॅट डेअरी प्रॉडक्ट्समध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांचं सेवन मर्यादित करणं गरजेचं आहे. फुल फॅट दुधाऐवजी स्किम्ड मिल्कचा पर्याय निवडता येतो. ग्रीन टी आणि लसूण यांचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो.

दररोज व्यायाम करा

नियमित शारीरिक हालचाल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. वेगाने चालणं, सायकलिंग, पोहणं आणि योगासारखे व्यायाम फायदेशीर ठरू शकतात. आठवड्यातून किमान 150 मिनिटं शारीरिक हालचाल करण्याचे उद्दिष्ट ठेवता येतं.

यासोबतच तणाव कमी करणं आणि आतड्यांचे आरोग्य म्हणजेच गट हेल्थ चांगली ठेवणंही महत्त्वाचं आहे. स्किम्ड मिल्कपासून बनवलेले दही यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

कधी औषधांची गरज पडते?

डॉक्टर बिमल छाजेर यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल केवळ आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे नियंत्रणात येईलच असं नाही. ज्या लोकांना कौटुंबिक इतिहासामुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा ज्यांना आधीपासून हृदयाच्या समस्या आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि औषधांची गरज भासू शकते.

अशा परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT