Pre-Holi Skincare Routine: ai
लाईफस्टाईल

Pre-Holi Skincare Routine: होळीच्या रंगांपासून त्वचेचं संरक्षण कसं कराल? जाणून घ्या 2 सोपे नैसर्गिक उपाय

Holi 2025: होळी हा सण रंगांशिवाय अपुरा असतो. त्यामुळे या दिवशी रंग लावणं साहजिक आहे. मात्र हे रंग तुमच्या शरीराचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. याच समस्येचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय आणले आहेत.

Saam Tv

होळी हा सण प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाला सगळेच एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. खरं तर होळी हा सण १४ मार्चला आहे. मात्र याच्या दहा दिवस आधीच हा सण खेळला जातो. होळीच्या आधीच लोकं घरात रंग आणि लहान मुलांसाठी पिचकाऱ्या, फुगे, गुलाल या साहित्याची खरेदी करून ठेवतात. पण होळीचे रंग जर तुमच्या त्वचेला डायरेक्ट लावले तर ते जात नाहीत. काहींना त्यामुळे इंफेक्शन होतं तर काहींचे केस दुसऱ्या दिवशीपासून गळायला लागतात.

होळी हा दिवस मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण करून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी रंग लावणं साहजीक आहे किंवा महत्वाचं आहे. पण त्यामुळे होणारं नुकसान तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही पुढील घरगुती सामानाचा वापर करू शकता. मुळात होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करा. हे रंग तुम्हाला चांगल्या दुकानात सहज मिळून जातील. जास्त केमिकल वापरलेले रंग शक्यतो टाळा अन्यथा ते रंग तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवतील.

होळी खेळण्यापुर्वी त्वचेची

तुम्ही होळी खेळण्यापुर्वी घरात वापरले जाणारे मॉइश्चर लावू शकता. कारण होळी खेळताना तुमच्या स्कीनला इजा पोहोचू शकते. त्यामध्ये असलेले केमिकल तुमचा स्कीनला ड्राय करू शकतात. त्यामुळे तुम्ही होळी खेळण्यापुर्वी मॉइश्चरायजरचा वापर करावा.

होळीच्या रंगानी केस ड्राय होतात का?

हो, तुमच्या केसात जर केमिकलचे रंग गेले की, तुमचे केस ड्राय होतात. तसेच तुमचे केस काहीच दिवसात जास्त प्रमाणात गळू लागतात. थोड्यावेळासाठीचा खेळ तुमच्या शरीराला खूप नुकसान करून जावू शकतो.

होळी खेळण्यापुर्वी केसांना काय लावावे?

तुम्हाला होळी खेळण्यापुर्वी केसांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. हे तेल केसांना लावून तुम्ही रंगांनी खेळलात तरी तुमच्या केसांना काही होणार नाही. तुम्ही केस वॉश केलेत तर केसांमधील रंगही सहज निघून जाईल.

घरगुती फेसपॅक

तुम्ही घरगुती पद्धतीने बेसन, खोबरेल तेल आणि हळदीचा फॅसपॅक लावून तुमच्या चेहऱ्यावरील रंग घालवू शकता. त्यासाठी कोणत्याही बाहेरील प्रोटक्टचा वापर करू शकता.

Edited By: Sakshi Jadhav


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT