Fatty Liver Diet, World Liver Day 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो हा गंभीर धोका; गांभीर्य ओळखा, अन्यथा...

Fatty Liver Symptoms: फॅटी लिव्हर ही वाढत्या चुकीच्या आहार व जीवनशैलीची देण आहे. लक्षणे ओळखून योग्य आहार, व्यायाम व जागरूकतेने यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

फॅटी लिव्हर म्हणजे तुमच्या यकृतात चरबी वाढणे होय. सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ही समस्या वाढत चालली आहे. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार असतात. एक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि दुसरा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. अनेकांचा असा समज आहे की, याचे प्रमाण मद्यपानामुळे वाढते. पण प्रत्यक्षात जगभरातल्या प्रत्येक तिसऱ्या वृद्ध व्यक्तीला NAFLDचा त्रास जाणवत असतो.

ज्यामध्ये मद्यपानाचे प्रमाण नसतं. विशेष बाब म्हणजे, ही समस्या सुरुवातीला ग्रेड १ मध्ये ओळखली गेली तर त्यावर मात करता येऊ शकते. पण जीवनशैलीतल्या काही चुका हा आजार पुढे नेऊन ग्रेड २ किंवा ३ पर्यंत पोहोचवतात. त्यामुळे सिरोसिस किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.

फॅटी लिव्हरची गंभीर लक्षणे

सुरुवातीला दिसणारी पहिली गंभीर चूक म्हणजे चुकीच्या आहाराचे सेवन करणे. पोट भरल्यासारखं वाटण्यासाठी साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि पॅकज्ड फूड्स लोक खातात. ब्रेड, बिस्किट, बर्गर, सोडा, चिप्स, शुगर फ्री फूड्स यामुळे लिव्हरमध्ये नकळत चरबी साठत जाते. त्याऐवजी तुम्ही भाज्या, फळं, विविध धान्य, कडधान्य याचा समावेश आहारात करावा.

दुसरी मोठी चूक म्हणजे चुकीची जीवनशैली. खूप वेळ बसून राहणे, हालचाल कमी करणे, व्यायाम न करणे यामुळे मेटाबॉलिझम हळू हळू काम करतो आणि लिव्हरची फॅट बर्न प्रक्रियाकाम करत नाही. तुम्ही आठवड्यात किमान १५० मिनिटे चालणे, व्यायाम, योगा किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग गरजेचे ठरते. दैनंदिन आयुष्यात चालणे, जिने चढणे अशा छोट्या हालचालींचाही फायदा होतो.

तिसरी गंभीर बाब म्हणजे काही आरोग्याच्या समस्या. लठ्ठपणा, टाइप २ डायबिटीज, उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यामुळे फॅटी लिव्हरची गती वाढते. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिटरेनियन डाएट सर्वोत्तम मानला जातो. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, ऑलिव्ह तेल, ड्रायफ्रुट्सचे आणि फॅटी फिश यांचा आहारात समावेश करावा. संशोधनानुसार, कॉफी पिण्यामुळेही लिव्हरवरील ताण कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रित ठेवणे. केवळ ५ ते १० टक्के वजन कमी केल्याने लिव्हरमधली चरबी कमी होते. त्यामुळे आहार, व्यायाम आणि जागरूकता यांच्या मदतीने ग्रेड १ फॅटी लिव्हरमधून सहज बाहेर पडता येऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; हगवणे कुटुंबांतील सदस्यांचा जामीन फेटाळला

Crime : कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला, सावत्र मुलीसमोर नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; बस स्टँडवर काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

SCROLL FOR NEXT