Crossword Puzzle, Online Game, Marathi Crossword Puzzle  Saam Tv
लाईफस्टाईल

Crossword Puzzle : बुद्धीला बनवा तल्लख, स्मरणशक्ती वाढवा; ऑनलाईन सोडवा मराठी शब्दकोडे

कोमल दामुद्रे

Crossword Puzzle :

लहानपणी वृत्तपत्रात नेहमीच तुम्ही शब्दकोडे पाहिलेच असेल. वृत्तपत्रातले एक पान हे नेहमीच शब्दकोड्यांसाठी राखीव असायचे. परंतु हल्ली याचे प्रमाण कमी होताना दिसले आहे. शब्दकोडे सोडवणे एक प्रकारचा खेळ आहे. ज्यामुळे मेंदू तल्लख होतो, तर स्मरणशक्ती देखील वाढते. यामुळे भाषेवरील पकड मजबूत होते आणि सामान्य ज्ञानात भर पडते.

या शब्दकोड्यांची जागा मोबाईलने घेतली आहे. स्क्रीन टाईम वाढल्याने शब्दकोडी कुठेतरी लोप पावली आहेत. मात्र अनेकांना शब्दकोडी सोडवणे आजच्या डिजिटल जगातही तितकच आवडतं. शब्दकोड्यांची आवड असणाऱ्यांना आपली हीच आवड आता जपता येणार आहे, तीही डिजिटल पद्धतीने. कारण शब्दकोडी ऑनलाईन सोडवता येणार आहे.

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

तुमचा शब्द कोडी सोडवण्याचा छंद आता डिजिटल रुपात जपता येणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT