Vangyache Kap Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Vangyache Kap Recipe : झटपट बनतील कुरकुरीत वांग्याचे काप; पारंपारिक खमंग रेसिपी पाहा

Fried Crispy Eggplants : बरेचदा काही कारणांमुळे आपल्याला नॉन व्हेज खाता येत नाही. काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात वरण भातासोबत तुम्ही सुरणाचे काप किंवा वांग्याचे काप अशा रेसिपीज ट्राय करु शकतो.

कोमल दामुद्रे

How To Make Vangyache Kap :

अनेकदा वरण-भातासोबत आपल्याला लोणची, चटणी किंवा कोशिंबीर खाण्याची चटक लागते. परंतु, तेच तेच पदार्थ खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. अशावेळी आपण अनेक नवीन पदार्थ ट्राय करण्याचा प्रयत्न करतो.

बरेचदा काही कारणांमुळे आपल्याला नॉन व्हेज खाता येत नाही. काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात वरण भातासोबत तुम्ही सुरणाचे काप किंवा वांग्याचे काप अशा रेसिपीज (Recipes) ट्राय करु शकतो. हा पदार्थ ताटाच्या डाव्या बाजूला वाढता येतो.

ही डिश बनवण्यासाठी साधरणत: १० ते १५ मिनिटे लागतात. जर तुम्हालाही वांग्याची भाजी खायचा वैताग येत असेल तर त्याचे काप बनवून मुलांना खाऊ घालू शकता. पाहूया झटपट बनेल अशी रेसिपी

1. साहित्य

  • वांगी- १ ते २

  • लाल तिखट - १ चमचा

  • हळद (Turmeric) - १ चमचा

  • धणे पावडर - अर्धा चमचा

  • मीठ - १ चमचा

  • आले - १ इंच

  • लसूण (Garlic) - ४ ते ५

  • मिरच्या - २ ते ३

  • रवा - १ वाटी

  • कॉर्नफ्लोअर - पाव वाटी

  • बारीक चिरलेली कोथिंबीर - पाव वाटी

  • तेल - आवश्यकतेनुसार

2. कृती

  • सर्वप्रथम वांग्याचे काप बनवण्यासाठी सगळ्यात आधी वांग धुवून त्याचे पातळ काप करा. चिरुन झाल्यानंतर हे काप पाण्यात ठेवा त्यामुळे ते काळे पडणार नाही.

  • मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार करुन त्यात हळद, मीठ, लाल तिखट, धणे पूड घालून एकत्र करा.

  • वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूनी हे मिश्रण लावा. त्यानंतर ताटात रवा, कॉर्नफ्लोर आणि तयार केलेला मसाला लावा.

  • वांग्याचे काप रव्यात व्यवस्थित रित्या घोळवून ठेवा. नंतर तव्यावर तेल गरम करुन एका बाजूने चांगले फ्राय करा.

  • दुसऱ्या बाजूने वांग्याचे काप शिजवून घ्या. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार आहे वरण-भातासोबत खायला झटपट बनणाके कुरकुरीत वांग्याचे काप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच गोविंदचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

Crime News: मीरा रोडमधील ड्रग्स प्रकरणाचं हैदराबाद कनेक्शन; ५००० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT