Paneer Chilli Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Paneer Chilli Recipe : हॉटेल सारखी पनीर चिल्लीची चव चाखायची आहे? झटपट बनेल

चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो.

कोमल दामुद्रे

Paneer Chilli Recipe : हल्ली भाजी म्हटलं तर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारा भाजीतील पदार्थ म्हणजे पनीर. नासलेल्या दुधापासून बनविण्यात येणारा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. पनीरचे अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये भाजीचे प्रकार अधिक असतात.

चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. अगदी स्टार्टरपासून ते भाजीपर्यंत अनेक पदार्थ पनीरपासून बनवता येतात.

स्वादासह आरोग्यासाठीही पनीर फायदेशीर ठरते. चटकदार, चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या पनीर चिल्लीची रेसिपी बनवूया आपल्या घरच्या घरीचं

साहित्य -

पनीर २५० ग्रॅम, कांदा १, हिरवी मिरची ४, ढोबळी मिरची १, कांद्याची पात २, आलं-लसुण पेस्ट २ चमचे, मैदा ५० ग्रॅम, कॉर्नफ्लॉर २ चमचे, चिली सॉस १ चमचा, टोमॅटो सॉस १ चमचा, सोया सॉस १ चमचा, काळी मिरी पावडर १/२ चमचा, तेल २० ग्रॅम, मीठ चवीनुसार, हळद (Turmeric) १/२ चमचा, गरम मसाला १ चमचा

कृती -

१. सगळ्यात पहिला एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लॉर, मिर्ची आणि मीठ घालून मिक्स करून घ्या आणि त्याची पेस्ट करा.

२. नंतर पनीर त्यात टाकून थोड्यावेळ बॅटरमध्ये ठेवा.

३. एका पॅन मध्ये थोड तेल (Oil) टाकून पनीर टिक्की भाजुन घ्या. आणि एका भांड्यात काढून घ्या.

४. त्याच पॅन मध्ये आल-लसूण पेस्ट, कांदा, मिर्ची आणि ढोबळी मिर्ची घालून शिजवून घ्या.

५. भाज्या शिजल्यानंतर सोया सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिल्ली सॉस, मिर्ची पावडर, अदरक-लसून पेस्ट घालून चांगल शिजवून घ्या.

६. त्यात थोडे पाणी टाकून उरलेली पनीर ग्रेव्ही टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. नंतर त्यात पनीर टाका आणि थोड्यावेळ शिजवा. नंतर गॅस बंद करून वरती कांद्याची पात टाका. आता पनीर चिल्ली तयार आहे. एका भांड्यात काढा आणि गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT