Potato Chilla Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Potato Chilla Recipe : स्वयंपाकघरातील 'या' पर्यायी पदार्थापासून बनवा क्रिस्पी बटाटा चीला, जाणून घ्या सोपी पध्दत !

बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचा कोणताही पदार्थ हा पर्यायी असतो.

कोमल दामुद्रे

Potato Chilla Recipe : बटाटा म्हटलं की असंही तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचा कोणताही पदार्थ हा पर्यायी असतो.

लहान मुले (Child) सहलीला किंवा आपल्याला गावी जायचे असल्यास आपल्याला सहज बनवता येणारी व दीर्घकाळ टिकणारी भाजी बटाटा. बटाट्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्याकडे करण्यात येतात. अगदी फ्राईज, भाजी, रस्सा, स्नॅक्स असे विविध चविष्ट पदार्थ आपण बटाट्यापासून तयार करतो.

बटाटा (Potatoes) चीला ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. आपण ते काही मिनिटांत बनवू शकतो. बटाटे जवळजवळ सर्व भाज्यांमध्ये वापरले जातात. नाश्त्यासाठी बटाट्याच्या चीला देखील बनवू शकतो. बटाटा चीला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण काही किसलेल्या भाज्या जसे गाजर, कोबी इत्यादी त्यामध्ये मिक्स करू शकतो. टोमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर बटाटा चीला सर्व्ह करू शकतो. आत्तापर्यंत तुम्ही बेसन चिला ते ओट्स चिला पर्यंतच्या रेसिपींची चव चाखून पाहिली असेल तर आता स्वादिष्ट पोटॅटो चीला उत्तम नाश्ता पर्याय आहे आणि काही मिनिटांत तयार करू शकतो.

साहित्य -

बटाटे -३ ते ४, कॉर्नफ्लॉर- २ चमचे, बेसन-२ चमचे, जीरा- १ चिमुटभर, चिरलेले कांदे-२, हिरवी मिरची-२, काळी मिरी पावडर- १/२ चिमुटभर, तेल-२ चमचे, मीठ स्वादानुसार

कृती -

- सर्वात अगोदर बटाटे धुवून सोलून घ्या. आता ते चांगले किसून घ्या आणि एका भांड्यात काढून घ्या. त्यात २ कप पाणी घाला आणि किसलेले बटाटे १५ मिनिटे भिजत ठेवा. त्यातून अतिरिक्त स्टार्च काढून टाकण्यास मदत करेल. १५ मिनिटांनंतर, जास्तीचे पाणी पिळून घ्या आणि बटाटे दुसऱ्या भांड्यात काढा.

- आता चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, बेसन आणि कॉर्नफ्लोर सारखे इतर सर्व साहित्य मिक्स करा.

- नॉन-स्टिक तव्यावर तेलाचे काही थेंब टाका आणि त्यावर तयार मिश्रण पसरवा. गोल आणि पातळ चीला बनवण्यासाठी ते चांगले पसरवा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. उरलेल्या मिश्रणातून आणखी एक चीला बनवा आणि सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT