Kairi Kadhi Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Kairi Kadhi Recipe: कच्च्या कैरीचं पन्हचं नाहीतर; बनवता येते टेस्टी अशी डिश, पाहा रेसिपी

How To Make Raw Mango Kadhi : कैरीपासून फक्त पन्हंच नाही तर त्याची कढी देखील बनवली जाते.

कोमल दामुद्रे

Raw Mango recipe : सध्या आंब्याचा मोसम सुरु आहे. या ऋतूमध्ये आंब्यापासून अनेक पदार्थांची चव चाखली जाते. उन्हाळ्यातील आंबा हा सर्वात खास असतो. या फळाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण वर्षभर थांबतात.

आंब्यापासून (Mango) मँगो पापड, मँगो शरबत, मँगो शेक असे अनेक स्वादिष्ट पदार्थही बनवता येतात. आंबा (Mango) हा फळांचा राजा आहे. पंरतु, कैरीपासून फक्त पन्हंच नाही तर त्याची कढी देखील बनवली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी कैरीपासून (Raw Mango) बनवा कढी. जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत.

1. साहित्य

  • कच्ची कैरी - 1

  • बेसन - 400 ग्रॅम

  • हिरवी मिरची - 2 बारीक चिरलेली

  • कढीपत्ता - 2 चमचे

  • हिंग - चिमूटभर

  • जिरे - 1/2 टीस्पून

  • हळद (Turmeric) - 1/2 टीस्पून

  • लाल तिखट - 2

  • तेल - 1 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

2. कृती

  • सर्वप्रथम कच्ची कैरी चांगली सोलून ती कापून त्याचा प्लप तयार करा.

  • कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर जिरे आणि हिरवी मिरची टाका.

  • टेम्परिंग झाल्यावर या कढईत कैरीचा पल्प टाका आणि थोडा वेळ शिजू द्या.

  • त्यात बेसन, मीठ, लाल तिखट घालून थोडा वेळ पाणी घालून शिजवावे.

  • एका भांड्यात तेलासह जिरे, हिंग, कढीपत्ता गरम करा आणि करीमध्ये टेम्परिंग घाला आणि गॅस बंद करा.

  • चविष्ट कच्च्या कैरीची कढी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

SCROLL FOR NEXT