फणसाची भाजी
Jackfruit Vegetable Saam TV
लाईफस्टाईल

Fansachi Bhaji Recipe: पावसात बनवा झणझणीत फणसाची भाजी, जाणून घ्या रेसिपी..

Shreya Maskar

कोकणातील हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गोड रसाळ फणस. फणसाचे गरे जेवढे खायला चवदार लागतात तेवढीच फणसाची भाजी देखील खायला चविष्ट लागते. फणसही हंगामी भाजी आहे. त्यामुळे पावसात आवर्जून तिचा स्वाद घ्यावा. फणस आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. फणसामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन अ, सी मोठ्या प्रमाणात असते. फणसात फायबरही मुबलक प्रमाणात असल्यामुळे भाजी पचायला देखील उत्तम राहते.

चला तर मग जाणून घेऊयात झणझणीत फणसाच्या भाजीची रेसिपी..

साहित्य

  • कच्चा फणस

  • कांदा

  • टोमॅटो

  • दही

  • शेंगदाणे

  • ओले खोबरे

  • फोडणीसाठी साहित्य : हिरव्या मिरच्या, तमालपत्र, लसूण, आले, गरम मसाला, मीठ, हळद, मोहरी, जिरे, हिंग

कृती

सर्वप्रथम फणस बारीक कापून घ्या. त्यानंतर शेंगदाण्यासोबत कुकरमध्ये उकडून घ्या. त्यानंतर फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तमालपत्र , मोहरी, जिरे पावडर, हळद, हिंग, लसूण, आले इत्याही पदार्थ चांगले तडतडू घ्यावेत. त्यानंतर फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरी, उकडलेले शेंगदाणे आणि फणसाचे तुकडे, हिरव्या मिरच्या सर्व पदार्थ छान परतून घ्यावे. एक उकळी आल्यावर त्यामध्ये थोडे दही टाकावे. यामुळे भाजीची टेस्ट आणखी वाढते. शेवटी चवीनुसार मीठ, लाल तिखट,ओले खोबरे आणि पाणी घालून भाजी छान शिजवून घ्यावी. अशाप्रकारे तुमची झणझणीत फणसाची भाजी तयार झाली. गरमागरम भाकरीसोबत याचा आस्वाद घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: विजयाचा उन्माद की जीवघेणा अतिउत्साह?

Special Report: 3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद

Special Report: भाजपचे नगरसेवक ठाकरेंच्या गळाला

Bajaj Freedom 125 : जगातील पहिली CNG बाईक भारतात लॉन्च; १२५ CC इंजिन, ३३०km अॅव्हरेज

Special Report : जरांगेंचा दौरा विधानसभेचा फेरा?

SCROLL FOR NEXT