Awala Lonache Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Awala Lonache Recipe : वर्षभर टिकणारं आबंट-गोड आवळ्याचं झणझणीत लोणचं, टिप्स लक्षात ठेवा बुरशी लागणारच नाही; पाहा रेसिपी

Gooseberry Pickle : आवळ्याचे फायदे मिळवळ्यासाठी तुम्ही त्याचे लोणचे, चटणी किंवा मुरंबा बनवू शकता. पाहूया आवळ्याचे टेस्टी आणि झणझणीत लोणच्यांची रेसिपी

कोमल दामुद्रे

How To Make Amla Pickle :

हिवाळा सुरु झाला की, आपल्याला सगळीकडे आवळा दिसू लागतो. आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक. आयुर्वेदात आवळ्याला विशेष महत्त्व आहे. शरीराच्या अनेक आजारांवर आवळा हा बहुगुणी. केसगळतीच्या समस्यांपासून ते तोंडाला चव येणाऱ्यासाठी आवळा हा सगळ्यात फायदेशीर.

या काळात अनेक गृहिणी लोणचे बनवायला ट्राय करतात. वर्षभर टिकणारे आणि ताटाच्या डाव्या बाजूला वाढला जाणारा पदार्थ लोणचे. आवळा हा चवीला तुरट असतो. परंतु, त्याचे लोणचे हे अगदी चवीचवीने खाल्ले जाते. बहुतेकांना आवळ्याचे चव आवडत नाही. आवळ्याचे फायदे मिळवळ्यासाठी तुम्ही त्याचे लोणचे, चटणी किंवा मुरंबा बनवू शकता. पाहूया आवळ्याचे टेस्टी आणि झणझणीत लोणच्यांची रेसिपी

1. साहित्य | Ingredients

  • आवळे २५० ग्राम (७-८) I Avla 250 gms (7-8)

  • लसूण (Garlic) - १०-१२ पाकळ्या I Garlic Cloves 10-12

  • मोहरी डाळ १०० ग्राम I Yellow Mustard 100 gms

  • मिरची पावडर ३ चमचे I Red Chili Powder 3 tsp

  • मीठ १-१.५ च I Salt 1-1.5 tsp

  • हळद १ चमचा I Turmeric 1 tsp

  • तेल - पाऊण वाटी/२०० ग्राम / I Oil ¾ cup /200 gms

  • मेथी दाणे १/२ चमचा I Methi Dana ½ tsp

  • हिंग १ चमचा I Asafoetida 1 tbsp

  • बडीशेप - १ चमचा I Fennel Seeds 1 tbsp

2. कृती

  • आवळ्याचे लोणचे बनवताना त्याला चांगले धुवून नीट पुसून सुकवून घ्या.

  • नंतर आवळ्याचे आणि लसणाचे तुकडे करा.

  • मोहरीची डाळ अर्धी मिक्सरमध्ये वाटून घ्या.

  • त्यानंतर एका मोठ्या भांड्यात मोहरीची वाटलेली डाळ, मीठ, तिखट, हळद आणि हिंग घालून मिक्स करा.

  • त्यात आवळा आणि लसणाचे तुकडे टाका. तेल गरम करुन त्यात मेथी दाणे, बडीशेप आणि हिंग घालून ढवळून घ्या. तयार मिश्रण थंड होऊ द्या.

  • नंतर सर्व मिश्रण एकत्रित करुन नीट ढवळून घ्या. २ तासानंतर काचेच्या बरणीत भरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT