Gobi Manchurian Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Gobi Manchurian Recipe : घरच्या घरी बनवा एकदम परफेक्ट कुरकुरीत कोबी मंच्युरियन, झटपट बनतील; पाहा रेसिपीचा व्हिडीओ

Evening Snacks Idea : संध्याकाळच्या वेळी मुलांना नाश्त्यात काही चटपटीत खायचे असते. परंतु, शरीरासाठी हेल्दी पदार्थ कसा बनवायाच हा पेच पालकांना पडतो. मुलांना बाहेरचे स्ट्रीट फूड खाण्यात अधिक मज्जा वाटते. परंतु, घरात बनवलेले पदार्थ खाताना ते नाक मुरडतात.

कोमल दामुद्रे

How To Make Gobi Manchurian :

संध्याकाळच्या वेळी मुलांना नाश्त्यात काही चटपटीत खायचे असते. परंतु, शरीरासाठी हेल्दी पदार्थ कसा बनवायाच हा पेच पालकांना पडतो. मुलांना बाहेरचे स्ट्रीट फूड खाण्यात अधिक मज्जा वाटते. परंतु, घरात बनवलेले पदार्थ खाताना ते नाक मुरडतात.

मुलांना सूप, मंच्युरियन, नूडल्ससारखे पदार्थ खायला अधिक आवडतात. चायनीजमधीस सगळ्यात आवडता आणि फेमस पदार्थ (Food) मंच्युरियन. मंच्युरियन चवीला मस्त आणि कुरकुरीत लागतात. जर तुम्हालाही मुलांना हेल्दी पदार्थ खाऊ घालायचे असतील तर कुरकुरीत कोबी मंच्युरियन ट्राय करु शकता. पाहूयात झटपट बनेल अशी रेसिपी (Recipes)

1. साहित्य I Ingredients

  • कोबी १ I Cabbage 1 medium

  • कॉर्नफ्लोअर ३/४ वाटी I Corn flour ¾ cup

  • मैदा ३/४ वाटी I All-purpose flour ¾ cup

  • सोया सॉस १ चमचा I Soya Sauce 1 tsp

  • लाल मिरची पावडर १ चमचा I Red Chili Powder 1 tsp

  • रेड चिली सॉस १ चमचा I Red Chilli Sauce 1 tsp

  • आलं लसूण पेस्ट १ चमचा I Ginger garlic paste 1 tsp

  • बारीक चिरलेला पातीचा पांढरा कांदा १/४ वाटी I Finely Chopped white colour onions of Spring Onions ¼ cup

  • फूड कलर (लाल) १/४ चमचा अंदाजे किंवा २ चिमूट I Food Color(Red) ¼ tsp approx or 2 pinch

  • मीठ चवीनुसार I Salt as per taste

  • तेल तळण्यासाठी I Oil for frying

2. कृती

  • सर्वात आधी कोबी किसून धुवून घ्या. किसलेल्या कोबीमध्ये मीठ, लाल तिखट, सोया सॉस, आले लसूण पेस्ट, फूड कलर, रेड चिली सॉस घालून हाताने चांगले मिसळा.

  • नंतर त्या आवश्यकतेनुसार पीठ आणि कॉर्न फ्लोअर घाला आणि चांगले मिक्स करा. त्यात वरुन पातीचा कांदा घालून पुन्हा मिक्स करुन घ्या.

  • गॅसवर तेल गरम करायला ठेवा. मंद आचेवर ५ मिनिटे क्रिस्पी मंच्युरियन तळून घ्या.

  • तळलेले मंच्युरियन प्लेटमध्ये घेऊन सॉस सोबत खा. मुलांना नक्की आवडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

26th July Rain : पालघरसह पुण्याला रेड अलर्ट, पाऊस धुमाकूळ घालणार, दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

SCROLL FOR NEXT