Roti Cooking Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Roti Cooking Tips: चपाती बनवल्यानंतर कडक-वातड होते? या सोप्या टिप्स वापरा, राहितील एकदम मऊसुत

Cooking Hacks : पहिल्यांदाच चपाती बनवत असाल तर ती मऊ किंवा गोलाकार बनत नाही. अनेकदा ती कडक, वातड किंवा जाडसर होते.

कोमल दामुद्रे

How To Make Soft Roti/Chapati :

जेवणाचे ताट हे चपातीशिवाय अपूर्णच आहे. अनेकांना चपाती बनवायला आवडते. हल्ली चपात्या बनवून देखील व्यवसाय केला जातो. परंतु, पहिल्यांदाच चपाती बनवत असाल तर ती मऊ किंवा गोलाकार बनत नाही. अनेकदा ती कडक, वातड किंवा जाडसर होते.

चपाती बनवण्यासाठी सगळ्यात आधी पीठ व्यवस्थितरित्या मळून घेणे. परंतु, जर तुम्ही व्यवस्थितरित्या पीठ मळले नसेल तर चपात्या नीट होत नाही. त्या अधिक कडक आणि वातड होतात.

पीठ मऊ मळले असेल तर त्याच चपात्या सॉफ्ट आणि टम्म फुलतात. तसेच त्या अधिक काळ मऊ आणि नरम राहातात. जर तुमच्याही चपात्या कडक, वातड किंवा जाडसर होत असतील तर या सोप्या टिप्स (Tips) फॉलो करा.

1. पीठ व्यवस्थित मळून घ्या

चपाती मऊ बनवण्यासाठी पीठ व्यवस्थितरित्या मळून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पीठ नीट मळले नसेल तर चपात्या कडक होतील. चपात्या मऊ बनवण्यासाठी त्यात थोडे दुध (Milk) किंवा मलाई घाला. त्यामुळे सॉफ्ट होण्यास मदत होईल.

2. पीठ कसे असायला हवे?

पीठ मळताना देखील काळजी (Care) घ्यायला हवी. पीठ घट्ट मळले असेल तर चपत्या लाटताना अधिक त्रास होतो. आणि चपात्या तुटत राहातात. यामध्ये पिठात आवश्यकतेनुसार पाणी घाला.

3. पीठावर तूप लावा

पीठ मळून झाल्यावर त्यात थोडे तूप घालून पुन्हा मळून घ्या. ज्यामुळे पीठ नरम राहिल. चपात्या लाटताना त्रास होणार नाही. तसेच त्या मऊ राहातील.

4. चपात्या नीट लाटा

पीठाचा थोडासा भाग घेऊन त्याचा गोळा तयार करा. पीठ तयार करण्यासाठी तळहाताने मळून त्याचा गोळा बनवा. चपाती लाटताना त्यांची कडा लाटावी. ज्यामुळे ती हळूहळू गोल गोल फिरेल व त्याला व्यवस्थित आकार मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT