महाराष्ट्रात सण उत्सव जसे साजरे केले जातात. त्याचप्रमाणे उपवास व्रत सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक ठेवत असतात. उपवासात लोक हलके, पचायला सोपे आणि पौष्टिक अशा पदार्थांची निवड करत असतात. त्यामध्ये साबुदाणा हा नेहमीच सर्वांचा आवडता मानला जातो. परंपरेने साबुदाणा खिचडी, वडे किंवा खीर केली जात असली तरी यावर्षी हेल्दी ट्रेंडमध्ये साबुदाणा चाटलाही विशेष मागणी असल्याचे दिसत आहे. पुढे आपण आपण कमी तेलात छान स्वादिष्ठ उपवासाची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
तुम्ही खिचडी बनवताना जास्त तेलाचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी हा हेल्दी पदार्थ नाही. पुढे तुम्हाला सोप्या आणि नव्या पद्धतीने उपवासाची खिचडी कशी बनवायची हे सांगणार आहोत. याची संपूर्ण रेसिपी जाणून घ्या.
सगळ्यात आधी साबुदाणा चाट बनवण्यासाठी साबुदाणा नीट धुऊन ४-५ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. फुगलेल्या साबुदाण्यात उकडलेले बटाटे, टोमॅटो, काकडी, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिसळली जाते. त्यात भाजून घेतलेले आणि कुस्करलेले शेंगदाणे टाकल्याने चवीला कुरकुरीतपणा येतो. शेवटी खडे मीठ, काळी मिरी पावडर, जिरे पावडर आणि लिंबाचा रस घातला की हा चविष्ट चाट सर्व्ह करण्यासाठी तयार होतो.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा चाट आवडतो. उपवासासाठी योग्य असल्यामुळे याला विशेष पसंती मिळते. यातील घटक शरीराला त्वरित ऊर्जा देतात, तसेच वजन कमी करण्याच्या प्रवासातही मदत करतात. त्यामुळे हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर हेल्दी पर्याय म्हणूनही लोकप्रिय ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.