Paneer 65 Recipe in Marathi Saam tv
लाईफस्टाईल

Paneer 65 Recipe: हॉटेलसारखं पनीर 65 बनवा घरच्या घरी, झटपट बनेल; रेसिपी ट्राय करुन पाहाच!

How To Make Panner 65 : तुम्ही घरच्या घरी पनीर 65 ट्राय करु शकतात. कसे बनवयाचे ते पाहूया

कोमल दामुद्रे

पनीर 65 रेसिपी:

जेवणात रोज पालेभाज्या, फळभाज्या खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे एखाद्या दिवशी काहीतरी नवीन वेगळ ट्राय करायला आवडतं. आपल्याकडे जेवणात कधीतरी वेगळा पदार्थ म्हणून पनीरची भाजी किंवा पनीरचे इतर पदार्थ केले जातात. त्यामुळे जेवायला देखील मज्जा येते.

पनीर म्हटलं की दोन घास जास्तच पोटात जातात. पनीर म्हटल्यावर आपल्याला फक्त पनीरची भाजी किंवा भूर्जी असे दोन पदार्थ आठवतात. परंतु त्याशिवाय तुम्ही घरच्या घरी पनीर 65 ट्राय करु शकतात. हे तुम्ही चपाती किंवा भातासोबतदेखील खाऊ शकतात. ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • २५० गॅम पनीर (Paneer)

  • ४ टेबलस्पून तांदळाचे पीठ

  • १/२ टीस्पून गरम मसाला पावडर

  • 1 टेबलस्पून लसूण (Garlic) पेस्ट

  • 2 टेबलस्पून दही (Curd)

  • १/२ कप पाणी

  • 1 कांदा

  • २ हिरव्या मिरच्या

  • २ टेबलस्पून टोमॅटो केचप

  • 2 चमचे लिंबाचा रस

  • २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर

  • 1/2 टीस्पून काळी मिरी

  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर

  • १ टेबलस्पून आले पेस्ट

  • 1 कप तेल

  • 1 टीस्पून जिरे

  • 1 कढीपत्ता

  • २ टेबलस्पून रेड चिली सॉस

  • आवश्यकतेनुसार मीठ

2. कृती

  • एका भांड्यात कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचे पीठ घेऊन त्यात आवश्यकतेनुसार मीठ घाला.

  • त्यानंतर त्यात काळी मिरी आणि तिखट,आले-लसूण पेस्ट, जिरेपूड, गरम मसाला, लिंबाचा रस घालून मिक्स करा.

  • आता या पिठात पनीर घाला आणि त्याला चांगले मिक्स करा. त्यानंतर कढईत तेल घेऊन पनीर मंद आचेवर तळून घ्या.

  • यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे टाका. त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घाला.

  • त्यानंतर चिली सॉस आणि टोमॅटो केचप आणि मीठ घाला. हे सर्व फास्ट गॅस ठेवून चांगले मिक्स करा.

  • तयार मिश्रणात दोन चमचे दही घाला. त्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे घाला. आणि मंद आचेवर तळून तेलात फ्राय करा. त्याला चांगले मिक्स करा.त्यावर थोडा लिंबाचा रस घाला. त्यानंतर गरम गरम पनीर 65 खाण्यासाठी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT